देशात नोटा चलनात येऊन आता बरीच वर्षे झाली आहे. अनेक नोटा बदलल्या सुद्धा. आता नवीन नोटा आणि काही जुन्या नोटा चलनात आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या नोटा तयार कशा होतात? अनेकांना हा प्रश्न पडत असेल तर काहींना याचं उत्तरही माहीत असेल. अशात ज्यांना नोटा कशा तयार होता हे माहीत नाही त्यांच्यासाठी आम्ही एक खास व्हिडीओ घेऊन आलो आहोत.
या व्हिडीओत युरोपातील युरोपियन सेंट्रल बँकेत (European Central Bank) नोटांसाठीचा कागद तयार करण्यापासून ते ती नोट चलनात कशी येते याचा खुलासा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, तुमच्या नोट छपाईबद्दलच्या बऱ्याचशा प्रश्नांचं उत्तर मिळेल.
या व्हिडिओत यूरो कसे छापले जातात हे दाखवलं आहे. त्यामध्ये कागदाच्या लगद्यापासून नोटांचा खास कागद कसा तयार होतो. त्याच्या शीट्स (Sheets of paper) कशा तयार केल्या जातात. त्या शीट्सवर युरोवरील चित्र आणि मजकूराचं प्रिटींग कसं केलं जातं, त्यात वॉटरमार्क (Water mark) कसा वापरला जातो हे सगळं दाखवलं आहे.
नोटांचा कागद (Paper for Currency Notes) इतर कागदापेक्षा वेगळा असतो. चलनी नोटांसाठी वापरला जाणारा कागद जगात फक्त चार ठिकाणी मिळतो. त्यात फ्रान्समधील आर्गो विगिज, अमेरिकेतील पोर्टल, स्वीडनमधील गेन, पेपर फ्रॅब्रिक्स ल्यूसेंटल यांचा समावेश आहे.