काही लोकांना आपल्या आवडीसमोर सगळं काही कमी वाटतं. आपली आवड किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी काही लोक काहीही करायला तयार असतात. पण अनेकदा त्यांना असं काही करणं फारच महागात पडतं. 'द सन' च्या रिपोर्टनुसार, लंडनमध्ये राहणाऱ्या Ben Pigeon सोबत असंच काहीसं झालं. तो आपल्या सहकाऱ्यांसोबत स्काय डायविंग करत होता. त्याचा कोच Andy Locke त्याला विमानातून खाली उडी मारल्यानंतर पॅराशूट द्वारे सुरक्षित खाली उतरण्याचं ट्रेनिंग देत होता. तो स्वत:ही पॅरा जंप करत होता. हे सगळं शूट करण्यासाठी त्याने हेल्मेटवर कॅमेरा लावला होता.
Ben Pigeon ने आपल्या सहकाऱ्यांसोबत ९ वेळा पॅरा जंप केली आणि पॅराशूटच्या माध्यमातून सुरक्षित खाली उतरला. त्याचं परफॉर्मन्स पाहून कोचसोबत इतर लोकही आनंदी होते. १०व्या दिवशी म्हणजे ट्रेनिंगच्या शेवटच्या दिवशी त्याने १० हजार फुटावरून उडी घेतली. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या एका साथीदाराने उडी घेतली. त्याच्या पायाचा धक्का जोरात बेनच्या डोक्याला लागला. ज्यामुळे तो बेशुद्ध पडला.
बेनचा कोच एंडीने यांनी आधीच जंप केली होती आणि पॅराशूटच्या माध्यमातून ते हळूहळू खाली उतरत होते. त्यांनी Ben ला वेगाने खाली येताना पाहिलं तर पॅराशूट अॅडजस्ट करून ते त्याच्या खाली आले. यावेळी ते जमिनीपासून ५ हजार फूट वर होते. एंडी यांनी बेनला पकडलं आणि प्रयत्न करून बेनचं पॅराशूट उघडलं. पॅराशूट ओपन होताच बेन वेगाने वर गेला आणि मग हळूहळू खाली आला.
वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे बेनचा जीव वाचला नाही तर १० हजार फूट उंचावरून पडून त्याचं काय झालं असतं याचा अंदाज कुणालाही लावता येतो. साधारण ६ वर्षांनंतर Ben Pigeon ने ही घटना आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केली. तो म्हणाला की, या घटनेचं त्याचं आयुष्य बदललं. तो आधी खूप स्काय डायविंग करत होता. पण त्यानंतर त्याने ते सोडलं. आता तो त्याच्या परिवारासोबत वेळ घालवणं जास्त पसंत करतो.