Petrol Pump Video: जगभरातून चोरीच्या वेगवेगळ्या अजब घटना समोर येत असतात. दररोज वाहन चोरीच्या घटना घडत असतात. बऱ्याचदा तर चोरी झालेली दुचाकी परतही मिळत नाही. पण कधी कधी वाहन चोरी करणाऱ्या गॅंगचा भांडाफोड होतो आणि ते पकडले जातात. पण सध्या एका अशा चोरीचा व्हिडीओ व्हायरल झालाय जो बघून तुम्ही हैराण व्हाल.
बऱ्याच घटनांमध्ये तर असंही होतं की, स्वत: वाहन मालक चोरांना पकडतात आणि त्यांना चोप देतात. केरळमधील अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एक चोर बाइक चोरी करतो आणि पेट्रोल पंपावर जातो. इथे बाइकचा मालक येतो आणि आपली बाइक परत मिळवतो. या पूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कोझिकोड जिल्ह्याच्या कदलुंडी गावातील पंचायत सदस्य प्रवीण यांनी बाइक गेल्या शनिवारी चोरी झाली होती. दुसऱ्या दिवशी याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली. पण पोलिसांनी बाइकची ओरिजनल कागदपत्रे जमा करण्यास सांगितली. प्रवीण आणि त्यांचे काही मित्र कागदपत्रे आणण्यासाठी त्यांच्या घरी गेले. व्हिडीओत एक कार दिसत आहे. असं सांगण्यात आलं की, प्रवीण यांचे मित्र डीझेल भरण्यासाठी पंपावर येत होते, तेव्हाच त्यांना प्रवीण यांची चोरी झालेली बाइक दिसली.
जशी त्यांनी पेट्रोल पंपवर एंट्री घेतली त्यांनी एका बाइकला ओव्हरटेक केलं. प्रवीण यांनी पाहिलं तर बाइक त्यांचीच होती. या बाइकवर दोन व्यक्ती बसले होते. त्यांना पकडण्यासाठी प्रवीण आणि त्यांचे मित्र तयार झाले. त्यांनी बाइक धरली आणि इतक्यात हेल्मेट घालून असलेली व्यक्ती पळून गेली. तर बाइकवर मागे बसलेली व्यक्ती पकडली गेली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.