Video : यूक्रेनी सैनिकाचा थोडक्यात वाचला जीव, स्मार्टफोनला लागली गोळी अन्....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 01:45 PM2022-04-19T13:45:06+5:302022-04-19T13:47:15+5:30

Smartphone Saved Ukrainian Soldier's Life: हा व्हिडीओ पहिल्यांदा सोशल मीडिया साइट रेडिटवर अपलोड करण्यात आला होता. ३० सेकंदाच्या या क्लीपमध्ये यूक्रेनी सैनिक आपल्या खिशातून स्मार्टफोन काढतान दिसतो.

Video : Ukrainian soldiers life save because of smartphone | Video : यूक्रेनी सैनिकाचा थोडक्यात वाचला जीव, स्मार्टफोनला लागली गोळी अन्....

Video : यूक्रेनी सैनिकाचा थोडक्यात वाचला जीव, स्मार्टफोनला लागली गोळी अन्....

Next

Smartphone Saved Ukrainian Soldier's Life:  सोशल मीडियावर यूक्रेनमधील युद्धादरम्यानचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अशातच एक हैराण करणारा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. यात दोन यूक्रेनी सैनिक आपसात बोलत आहेत. एका स्मार्टफोनमुळे एका सैनिकाचा जीव थोडक्यात वाचला. व्हिडीओत बघू शकता की, एका सैनिका आपल्या खिशातून मोबाइल फोन काढला आणि दाखवला ज्यात एक ७.६२ एमएमची गोळी अडकली आहे.

मोबाइलमुळे वाचला सैनिकाचा जीव

हा व्हिडीओ पहिल्यांदा सोशल मीडिया साइट रेडिटवर अपलोड करण्यात आला होता. ३० सेकंदाच्या या क्लीपमध्ये यूक्रेनी सैनिक आपल्या खिशातून स्मार्टफोन काढतान दिसतो. मोबाइलच्या मागच्या बाजूला एक गोळी लागली होती. जी रशियन सैनिकांनी फायर केली होती.

कथितपणे ही गोळी ७.६२ मिमिची आहे. असं दिसतंय की, गोळी मोबाइलच्या मागच्या बाजूला लागून अडकली. जर गोळी मोबाइल पार करून गेली असतील तर सैनिकाचा मृत्यू होऊ शकला असता.

रेडिटवर या व्हिडीओ ५२ हजारांपेक्षा जास्त अपवोट्स मिळाले आहेत. व्हिडीओला इंटरनेवर काही कमेंट्स येत आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'फोन नोकियाचा होता का?'. एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, जर हा नोकियाचा मोबाइल असे तर हे शक्य आहे. 
 

Web Title: Video : Ukrainian soldiers life save because of smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.