Women Playing Kabaddi In Saree In Village: पुरूषांना तर तुम्ही कबड्डी खेळताना अनेकदा पाहिलं असेल, पण महिलांना कबड्डी खेळताना पाहिलं नसेल किंवा क्वचित पाहिलं असेल. वृद्ध महिलांना कबड्डी खेळताना तर तुम्ही कधीच पाहिलं नसेल. तेही साडी नेसून. सध्या महिलांचा कबड्डी खेळतानाचा एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघून नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर फुलेलं आणि तुम्ही या महिलांचं कौतुकही कराल.
गावातील वृद्ध महिला कबड्डी खेळत असतानाचा हा व्हिडीओ अनुपमान गोस्वामी 52 नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत गावातील एक मोकळं मैदान दिसत आहे. चारही बाजूला झाडी आहेत आणि मैदानात साडी नेसलेल्या महिला एन्जॉय करत कबड्डी खेळताना दिसत आहेत. तर मैदानाच्या चारही बाजूने इतर महिला कबड्डी खेळ बघताना दिसत आहेत.
महिलांच्या कबड्डीच्या या व्हिडीओला आतापर्यंत दोन मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पसंत केलं आणि दीड मिलियनपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. इतकंच नाही तर 21 हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओवर कमेंट्स करत या महिलांचं कौतुक केलं आहे. लोक भरभरून त्यांचं कौतुक करत आहेत.
एका यूजरने लिहिलं की, "वय कितीही वाढलं तरी बालपणीच्या आठवणी कधी जात नाहीत. त्या आठवणी पुन्हा जगणं सगळ्यात चांगला अनुभव असतो". दुसऱ्याने लिहिलं की, "हाच खरा आनंद आहे, या महिलांना सलाम".