ज्वालामुखीचा उद्रेक जगभरात अनेकदा पाहायला मिळतो. ज्वालामुखीच्या उद्रेकाचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावरही व्हायरल होतात. पण नुकताच इंडोनेशियाच्या जावा बेटावरील सेमेरू ज्वालामुखीमध्ये झालेल्या स्फोटाचा व्हिडिओ समोर आला आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर अनेकांचा थरकाप उडाला. हा व्हिडीओ पाहून अंदाज बांधता येतो की स्फोटानंतर आजूबाजूच्या परिसरात काय हाल झाले असतील.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ प्रत्यक्षात सेमेरू ज्वालामुखीच्या स्फोटानंतरचा आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर लोक जीव वाचवण्यासाठी वेगाने धावत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्याच्या ढिगाऱ्यांमुळे एक पूलही उद्ध्वस्त झालाय. तसेच आकाशात 15000 मीटर उंचीपर्यंत राख उडताना दिसत आहे. या उद्रेकानंतर अनेक व्हिडीओज समोर येत आहेत.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, ज्वालामुखीचा उद्रेक इतका दुर्मिळ नाही. पण कधी कधी त्याचा परिणाम असा होतो. त्याच वेळी, दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, ज्वालामुखीजवळ राहणा-या लोकांचे जीवन नेहमीच दहशतीमध्ये जाते. विशेष म्हणझे, सेमेरू इंडोनेशियातील 130 सक्रिय ज्वालामुखीपैकी एक आहे. सेमेरू हे सर्वात दाट लोकवस्तीच्या प्रांतांपैकी एक आहे. स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात मदत आणि बचावकार्य सुरू झाले.