एकीकडे बदलत्या लाइफस्टाइलमुळे आणि वेगवेगळ्या आरोग्यासंबंधी समस्यांमुळे जगभरातील लोकांची झोप उडाली असताना दुसरीकडे एक असंही गाव आहे, जिथे लोक कुठेही आणि कधीही झोपू लागले आहेत. होय हे खरंय! ही घटना आहे कजाकिस्तानची. येथील कलाची गावातील लोक रहस्यमय पद्धतीने झोपू लागले आहेत. कधी कुणी ड्रायव्हिंग करताना, कधी चालता-चालता तर कधी काम करता करता ते झोपू लागले आहेत. पण याचं कारण काय असावं? चला जाणून घेऊ कारण...
संशोधक आणि डॉक्टरांनी वेगवेगळ्या प्रकारे लोकांच्या अशा झोपण्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला. पण स्पष्ट आणि ठोस असं कारण त्यांना आढळलं नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या झोपेमुळे या लोकांना नुकसानही होत आहे. अनेक लोक झोपेतून उठल्यावर वेगळाच व्यवहार करत आहेत. वेगळ्याच गोष्टी ते करु लागले आहेत.
स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, या स्लीपिंग डिसऑर्डरचं एकमेव कारण म्हणजे यूरेनियम माइन्स आहेत. यूरेनियममधून निघणाऱ्या गॅसमुळे आपल्या शरीरावर वाईट प्रभाव पडतो. आपल्याला बेशुद्ध करण्याची क्षमता या गॅसमध्ये असते.
गेल्या ३ ते ४ वर्षात या परिसरातील अनेक लोकांनी गाव सोडलं आहे. या स्लीपिंग डिसऑर्डरने लोकांना गाव सोडण्यास भाग पाडलं आहे.