निरोगी राहण्यासाठी एक्सपर्ट सगळ्यांनाच सामान्यपणे रोज ७ ते ८ तासांची झोप घेण्याचा सल्ला देत असतात. पर आजच्या धावपळीच्या जीवनात सगळ्यांनाच हे शक्य होत नाही. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत, जेथील लोक सतत झोपत असतात. इतकंच काय तर येथील लोक चालता-चालताही झोपतात. त्यामागचं कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
ज्या गावाबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत हे गाव कझाकिस्तानमध्ये असून या गावाचं नाव कलाची आहे. असं सांगितलं जातं की, येथील लोक अनेक महिने झोपतात. यामुळेच या गावाला स्लीपी हॉलो असंही म्हटलं जातं.
या गावाबाबत असा दावा केला जातो की, येथील प्रत्येक व्यक्ती वर्षातून कमीत कमी एक महिना झोपतो. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, या गावातील लोकांना असं काय झालं आहे की, ते इतके झोपतात?
कलाची गावातून जेव्हा अशा घटना वाढल्या आणि समोर आल्या तेव्हा वैज्ञानिकांनी यावर रिसर्च केला. त्यांनी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, या गावातील लोकांसोबत हे काय आणि कशामुळे होत आहे. तेव्हा रिसर्चमधून समोर आलं की, येथील लोकांसोबत ही समस्या दूषित पाण्यामुळे होत आहे. या गावातील पाण्यात कार्बन मोनो-ऑक्साइड जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे लोकांची ही स्थिती झाली आहे.
येथील स्थिती इतकी वाईट झाली आहे की, लोक अनेकदा चालता-चालता झोपतात. कलाची गावामध्ये पहिल्यांदा ही घटना २०१० साली समोर आली होती. या गावातील शाळेतील अनेक मुले बसल्या बसल्या झोपले होते. ते असे झोपले की, अनेक दिवस झोपूनच राहिले. आता कार्बन मोनो-ऑक्साइडचा प्रभाव या गावातील १४ टक्के लोकांवर पडला आहे. दिवसेंदिवस ही समस्या गावातील लोकांमध्ये वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक लोक गाव सोडून गेले आहेत. जे थांबलेले आहेत त्यांना ही समस्या होत आहे.