भारतात विविध परंपरा आहेत. वेगवेगळ्या जाती, धर्म, रिती-रिवाज आणि संस्कृतीचा अनोखा संगम इथे बघायला मिळतो. काही दिवसांपूर्वीच देशातील अनेक भागांमध्ये दिवाळी जल्लोषात साजरी करण्यात आली. पण तुम्हाला दिवाळीनंतर साजरा होणाऱ्या 'गोरेहब्बा'? बाबत माहीत आहे का? जेवढं अजब या उत्सवाचं नाव आहे तेवढाच हा उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे.
हा अनोखा उत्सव तामिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमेवरील गुमतापुरा गावात साजरा केला जातो. यात लोक गायीचं शेण एका जागी जमा करतात. त्यानंतर एकमेकांवर फेकून हा उत्सव साजरा करतात. सोशल मीडियावर या उत्सवाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात गावातील लोक एकमेकांवर शेण फेकताना दिसत आहेत. तेच लोक आनंदाने हा उत्सव साजर करत आहेत.
गोरेहब्बा उत्सवाचा नजारा होळीप्रमाणेच असतो. फक्त इथे रंगांऐवजी शेणाने एकमेकांना भरवलं जातं. तेच यूपी -बिहारच्या काही भागांममध्ये चिखलाने होळी खेळली जाते. पण गुमतापुरा गावातील हा उत्सव सर्वात वेगळा आहे.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, हा उत्सव १०० वर्ष जुना आहे. यात आजूबाजूच्या भागातील लोकही सहभागी होतात. अशी मान्यता आहे की, शेणाने फाइट केल्याने लोकांचे अनेक आजार दूर होतात. सोबतच याने व्यक्ती निरोगी राहतो.