(Image Credit : YouTube)
टायटॅनिक सिनेमातून एका विशाल जहाजाची, त्याच्या डुबण्याची आणि जॅक-रोजची लव्हस्टोरीची सगळ्या जगाच्या लक्षात असेल. हा सिनेमा ज्यांनी ज्यांनी पाहिला असेल त्या सर्वांच्याच नेहमी स्मरणात असेल. पण आज आम्ही तुम्हाला याच टायटॅनिकमधील एका नर्सबाबत सांगणार आहोत. या नर्सची कहाणी आपल्याला प्रेरणा आणि हिंम्मत देते. या नर्सचं नाव आहे वायलेट जेसप. या नर्सने तिनदा मृत्यूला मात दिली. आज जरी ती या जगात नसली तरी तिची कहाणी खरंच प्रेरणादायी ठरेल.
वायलेटने तीन अशा जहाजांवर नर्स म्हणून काम केलं जे मोठ्या दुर्घटनेचे शिकार झालेत. यातील एक टायटॅनिक हेही होतं. तिच्या नशीबाने मृत्यूला मात देण्यात तिची नेहमीच साथ दिली.
(Image Credit : loredanacrupi.wordpress.com)
१८८७ मध्ये जन्माला आलेल्या वायलेटला बालपणी टीबी झाला होता. तिची वाचण्याचा आशा अजिबात नव्हती. असे म्हणतात ना नशीबापेक्षा मोठं काही नसतं. तेच झालं वायलेटने टीबीलाही मात दिली. वडिलांचं निधन झाल्यावर ती ब्रिटनमध्ये गेली. तिची आई सुद्धा जहाजावर काम करायची. नंतर घर चालवण्यासाठी वायलेटने सुद्धा जहाजावर नर्स म्हणून काम सुरू केलं. त्यावेळी तिचं वय २१ होतं.
आधी वायलेटने Olympic नावाच्या जहाजावर नर्स म्हणून काम करायला सुरूवात केली. हे वर्ष होतं १९१०. सप्टेंबर १९११ मध्ये या जहाजाचा अपघात झाला. हे जहाज समुद्रात एका दुसऱ्या जहाजाला भिडलं. भरपूर नुकसानही झालं आणि अनेकांचा जीवही गेला. पण या अपघातात वायलेटला काहीच झालं नाही.
(Image Credit : bashny.net)
नंतर १९१२ मध्ये वायलेटने टायटॅनिकवर नर्स म्हणून काम करण्यास सुरूवात केली. हे जहाज बर्फाच्या एका डोंगराला भिडलं. या घटनेने साऱ्या जगाला हादरा बसला. जहाजातील साधारण १५०० पेक्षा जास्त लोक मारले गेले. पण यावेळीही वायलेटचं नशीब तिच्यासोबत होतं. यावेळीही ती वाचली.
(Image Credit : YouTube)
त्यानंतर वायलेटने १९१६ मध्ये ब्रिटॅनिक जहाजावर नर्स म्हणून काम करण्यास सुरूवात केली. हे जहाज समुद्रातील एका खदानीत घुसलं. यात ३० लोकांचां मृत्यू झाला. पण पुन्हा नशीबाने वायलेट वाचली. या तीन मोठ्या दुर्घटनांमधून वाचल्यानंतर वायलेट जगात Miss Unsinkable नावाने ओळखली जाऊ लागली. नंतर ५ मे १९७१ ला तिचं निधन झालं.