कुठेही जा सिनेमागृह म्हटल्यावर खूपसाऱ्या खुर्च्या आणि समोर मोठ्ठा पडदा असं चित्र असतं. काही ठराविक सिनेमागृहांमध्ये मोजक्या आणि मोठ्या आकाराच्या आरामदायी खुर्च्या असतात. पण आता यापलिकडे जाऊन एका सिनेमागृहात डबल बेड लावण्यात आले आहे.स्वित्झर्लंडच्या एका सिनेमागृहात पारंपारिक खुर्च्यांना हद्दपार करून आता डबल बेड लावले आहेत. म्हणजे लोकांना आता आरामात झोपून सिनेमे बघता येणार आहे. या अनोख्या स्क्रीनची सुरूवात नुकतीच येथील एका सिनेमागृहात करण्यात आली आहे. याआधी सोफा सीट ही पद्धत आहेच. पण आता बेड लावण्यात येत आहेत.प्रेक्षकांना अनोखा अनुभव आणि त्यांना आरामात घरी जसं निवांत बसून किंवा झोपून सिनेमा बघता येतो तसा अनुभव देण्यासाठी ही संकल्पना समोर आली आहे. सामान्यपणे सिनेमागृहातील स्वच्छतेचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. पण इथे सिनेमागृह मालकांनी याची काळजी घेतली आहे. इथे प्रत्येक शोनंतर बेडशिट बदलल्या जाणार आहेत. स्वच्छता आमच्यासाठी प्राधान्य असणार असेही त्यांनी सांगितले.या वेगळ्या संकल्पनेची चाचणी घेण्यात आली आणि हे लोकांना आवडेल, अशी आशा सिनेमागृहाने व्यक्त केली आहे. या व्हिआयपी बेडरूम स्क्रीनमध्ये ११ डबल बेड असणार आहेत आणि तसेच हे बेड अॅडजस्टही करता येणारे आहेत. आता नक्कीच सर्वांना प्रश्न पडला असेल की, याचं तिकिट किती असणार आहे. तर याचं तिकीट स्वित्झर्लॅंडच्या करन्सीनुसार ४ फ्रँकस् म्हणजेच भारतीय करन्सीनुसार ३ हजार ३०० रूपयांपेक्षा अधिक असेल.
VIP बेडरुम स्क्रीन; ना सीट ना सोफा, डायरेक्ट डबल बेड!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 1:31 AM