Viral Moose Video: सोशल मीडियावर दररोज प्राण्यांचे विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात अनेकदा दुर्मिळ आणि नामशेष होणाऱ्या प्राण्यांचेही सुंदर असे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दुर्मिळ असा पांढरा हरीण(White Moose) साठलेल्या पाण्या अंघोळीचा आनंद घेताना दिसतोय.
ट्विटरवर हा व्हिडिओ व्हायरल होत असून, 1 कोटी 30 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ स्विडनचा असल्याचा दावा करण्यात येतोय. व्हिडिओ जुना आहे, पण ट्विटरवर शेअर केल्यामुळे पुन्हा चर्चेत आलाय. विशेष म्हणजे, पांढऱ्या हरणांची संख्या फार कमी आहे. ट्विटरवर गेब्रिएल कोर्नो नावाच्या यूजरने हा शेअर केला आहे.
व्हडिओसोबत त्यांनी लिहीले की, हा व्हिडिओ स्विडनच्या वार्मलँड काउंटीचा आहे. हँस नीलसन नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हँस नीलसन स्थानिक मीडियाला सांगितले की, हा व्हिडिओ त्यांनी 5-6 वर्षांपूर्वी रेकॉर्ड केला होता. स्विडनच्या स्वेरिए रेडियोमध्ये हा व्हिडिओ शूट केला होता. White Moose अतिशय दुर्मिळ असून, पश्चिम वार्मलँडमध्ये 50 पांढऱ्या हरणांचा एक कळप राहत असल्याची माहिती नीलसनने दिली.
ज्यास्त तापमानात राहू शकत नाहीस्विडनशिवाय कॅनडा आणि अमेरिकातील अलास्कामध्येही हे पांढरे हरीण पाहायला मिळतात. हा प्राणी एका विशेष तापमानात राहतो, 50 डिग्री फारेनहाइटपेक्षा जास्त तापमान याला सहन होत नाही.