Chips on sale: अचानक भूक लागल्यानंतर आपल्यापैकी अनेकजण बाजारातून 5-10 रुपयांचे चिप्सचे पॅकेट विकत घेऊन खातात. एका छोट्या पॅकेटमध्ये 15-20 चिप्स मिळतात. आपल्या घरात पाहुणे आल्यावर आपण अनेकदा चिप्स देतो. लग्न-समारंभातही चिप्स दिले जातात. चिप्स अतिशय कमी किमतीत मिळणारे खाद्य आहे. पण, एका ई-कॉमर्स वेबसाइटवर एक चिप सुमारे 2 लाख रुपयांना विकले जात आहे.
एक चिप्स सुमारे दोन लाखांना तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, ई-कॉमर्स वेबसाइटवर फक्त एका चिप्सची किंमत £2,000 (रु. 1.9 लाख) आहे. आता तुम्ही विचार करत असाल की यात विशेष काय आहे? प्रिंगल्स चिप्सचा एक तुकडा eBay वर तब्बल £2,000 मध्ये विकला जात आहे. चिप्सच्या मालकाचा दावा आहे की, त्याचे हे चिप्स अतिशय कुरकुरीत आणि दुर्मिळ आहेत. या चिप्समध्ये क्रीम आणि कांद्याची चव मिळते.
चिप्सचे तुकडे हजारोंमध्ये विकले जात आहेतबकिंगहॅमशायर येथील दुकानदाराने दावा केला की, या चिप्स अगदी नवीन, न वापरलेल्या, न उघडलेल्या आणि नुकसान न झालेल्या आहेत. विशेष म्हणजे, eBay वर फोल्ड केलेले प्रिंगल्स विकणारा तो एकमेव नाही. काही लोक अगदी कमी किमतीमध्येही ते विकत आहेत. Reddit मध्ये, एक विक्रेता फक्त £50 मध्ये क्रीम आणि कांद्याच्या चवीसह दोन चिप्स देत आहे. तर मँचेस्टरमध्ये, हनी ग्लेझ्ड हॅम फ्लेवर्ड प्रिंगल्स समान किंमतीला उपलब्ध आहे, परंतु अतिरिक्त वितरण शुल्क £15 आहे. तुम्ही हे दुर्मिळ चिप्स विकत घ्याल का?