आतापर्यंत तुम्ही कधी कोणत्या इमारतीला चालताना पाहिलंय का? इंजिनिअर्सच्या मेहनतीमुळे चक्क एक इमारत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यास यश मिळालं आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी अख्खी ५ मजल्यांची इमारत शिफ्ट करण्याचं काम इंजिनिअर्सनी केलं आहे. चीनमधील शांघाईच्या इंजिनिअर्सनी हा पराक्रम केला आहे. १९३५ मध्ये तयार करण्यात आलेली एका शाळेची इमारत मूळ जागेवरून उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवली आहे.
या इमारतीचे वजन ७ हजार ६०० टन होतं. सुरूवातीला जॅकच्या मदतीने इमारत उचलून रोबोटिक टेक्नोलॉजीचा वापर करत दुसरीकडे हलवण्यात आले आहे. ऐतिहासिक वास्तू जपण्याच्या विचाराने शहराच्या हे नवीन ठिकाणी ही इमारत हलवण्यात आली आहे. रिपोर्टनुसार या जुन्या इमारतीच्या जागेवर एक नवीन प्रोजेक्ट(कमर्शियल ऑफिस कॉम्पलेक्स) सुरु होत आहे. त्यासाठी जागा कमी पडत होती. म्हणून ही इमारत हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही इमारत पूर्णपणे पाडण्याचा पर्यायही समोर ठेवण्यात आला होता. पण असं न करता इमारतीला बाजूला करण्यासाठी अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार करण्यात आला. बाबो! कारप्रेमी पठ्ठ्यानं घरावर बांधली स्कॉर्पिओच्या आकाराची पाण्याची टाकी, महिंद्रा म्हणाले...
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार काँक्रिटपासून तयार करण्यात आलेल्या या भक्कम इमारतीला इंजिनिअर्सच्या एका टिमने हलवले. १९८ रोबोटिक पायांचा वापर करण्यात आला असून याच्या साहाय्याने जवळपास ६४ मीटरच्या अंतरावर या इमारतीला हलवण्यात आलं आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला १८ दिवसांचा कालावधी लागला होता. वेगवेगळ्या इमारती एका जागेवरून इतर ठिकाणी हलवण्याचे काम चीनमध्ये पूर्वीपासून केलं जात आहे. इंजिनिअर्सनी रोबोटिक्स पायांचा आधार घेत या इमारतीला हलवण्याचे काम केलं आहे. लय भारी! ७० वर्षाच्या मराठमोळ्या आजींच्या रेसिपींची कमाल; YouTube ने सिल्वर बटन देऊन केला गौरव