आपण जितक्या मेहनतीनं काम करतो. तेवढा पगार आपल्याला मिळायला हवा. असं प्रत्येक नोकरी करत असलेल्या माणसाला वाटत असतं. आपला पगार वाढावा अशी इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते. पण काम न करताच महिन्याच्या महिन्याला पगार मिळतो असं तुम्ही कधी ऐकलंय का? इटलीतून असाच एक विचित्र प्रकार समोर आला आहे. गेल्या १५ वर्षांपासून काम न करता या माणसाला घरबसल्या पगार मिळत आहे.
ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार ही घटना इटलीची आहे. मेडीकल विभागात काम करत असलेली ही व्यक्ती कोणतीही नोटीस न देता गेल्या १५ वर्षांपासून कामावर येत नव्हती. सगळ्यात आर्श्चयकारक बाब म्हणजे कामावर नसतानाही या व्यक्तीला प्रत्येक महिन्याची सॅलरी मिळत राहिली. एकही असा महिना गेला नाही जेव्हा या व्यक्तीला पैसे मिळाले नाही.
या प्रकाराचा खुलासाही खूप मनोरंजक पद्धतीनं झाला. रिपोर्ट्सनुसार या माणसाचं २००५ मध्ये आपल्या बॉसबरोबर भांडण झालं होतं, त्यानं मॅनेजरला धमकीही दिली होती. काहीकाळानंतर मॅनेजर निवृत्त झाला आणि याच दरम्यान हा माणूस ऑफिसमध्ये अनुपस्थित राहू लागला. असं करत करत जवळपास १५ वर्ष हा माणूस ऑफिसलाच गेला नाही.
बोंबला! स्विमिंग पूलमध्ये अनोखळी मुलीशी बोलायला गेला; पत्नीनं पाहताचं केलं असं काही, पाहा व्हिडीओ
अलिकडेच पोलिसांनी धोका दिल्याप्रकरणी तसंच सुनावणीला अनुपस्थित राहिल्या प्रकरणी या माणसाची चौकशी सुरू केली त्यावेळी हा खुलासा झाला. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. विशेष म्हणजे एचआर विभाग आणि मॅनेजरलाही याबाबत काही कल्पना नव्हती. ऑफिसला येत नसतानाही या माणसाला पगार कसा काय दिला जात होता. याबाबत पोलिस चौकशी करत आहेत.
चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार काही मोठ्या अधिकाऱ्यांंचा हा प्रकरणात हात असू शकतो. म्हणून पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे. या माणसाची ओळख अद्याप समोर आलेली नाही. या माणसानं पब्लिक सेक्टर जॉब्समध्ये लांबच लांब सुट्टी आणि सॅलरी मिळवण्याचा रेकॉर्ड केला आहे. या माणसाला १५ वर्षात ५.३८ युरो म्हणजेच जवळपास ४.८ कोटी रूपये पगार मिळाला आहे. या माणसाचं वय ६७ वर्ष असल्याचं सांगितले जात आहे.