लॉकडाऊनमध्ये अनेकांना कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. समाजातील अनेक प्रसिद्ध तसंच सधन लोकांनी गोरगरीबांना, प्रवासी मजूरांना अन्न पुरवले. कारण कोरोनाच्या माहामारीचा प्रसार वाढत असल्यामुळे अचानक लॉकडाऊन करण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. अशा स्थितीत अनेकजण आपल्या घरापासून खूप लांब होते. त्यावेळी खिशात पैसे किंवा पोटाला अन्न नाही अशा लोकांना मदत करण्याचे काम काही लोकांकडून सुरू होते. असाच एक प्रकार दिल्लीतून समोर येत आहे.
राजधानी दिल्लीमध्ये एक माणूस केवळ १० रुपयात लोकांना जेवण पुरवत आहे. सध्याच्या काळात १० रूपयात चहा मिळणंसुद्धा कठीण आहे. असं असूनही हा माणूस अन्नदाता बनून गरजू लोकांना केवळ १० रूपयात जेवण उपलब्ध करून देत आहे. हे भोजनालय दिल्लीतील बाबरपूर मेट्रो स्थानकाजवळ आहे. किरण वर्मा यांनी हे भोजनालय सुरू केलं असून नेहमीच सामाजीक कार्यात आपला हातभार लावत असतात.
Video : कमाल! कात्री, कंगवा घेतला अन् स्वतःच न्हावी बनला, अशी केली जबरदस्त हेअरस्टाईल
हे भोजनालय सुरू करण्याच्यावेळी बेरोजगारांना मदत करता येईल असा विचार त्यांच्या मनात आला होता. जवळपास १० लोक यांच्या या दुकानात काम करतात. लॉकडाऊनमध्ये ज्यांची नोकरी गेली त्यांना या ठिकाणी काम देण्यात आलं आहे. किरण यांच्या दुकानाचं भाडं ६० हजार रूपये इतकं आहे. या भोजनालयात गरिब लोकांना डाळ, भाजी, भात, पूरी, हलवा असं पूर्ण जेवण मिळतं. दर आठवड्याचा मेन्यू वेगवेगळा असतो. सोशल मीडियावर सध्या या भोजनालयाचा फोटो व्हायरल होत आहे. अरे व्वा! साफसफाई करताना मिळाली नेहरू-आंबेडकरांची स्वाक्षरी असलेली आजोबांची डायरी; पाहा फोटो