सांगली : मिरज तालुक्यातील गुंडेवाडी गावातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात शनिवारी सकाळी आश्चर्यकारक घटना घडली. तुमचा विश्वास बसणार नाही पण गावातील एका वानराने हनुमान मंदिरात मारूतीला दंडवत घालत प्राण सोडले आहेत. ग्रामस्थांची मंदिरात पूजा, आरती सुरू असताना एक वानर त्या ठिकाणी आले आणि मंदिरात दंडवत घालू लागले. त्यानंतर या वानरानं आपले प्राण सोडले. मंदिरात उपस्थित असलेल्या काही नागरिकांकडून ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. घडलेल्या प्रकारामुळे ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले आहेत.
सोशल मीडियावर या वानराच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. माणसं जशी सहज मंदिरात येऊन दर्शन घेतात अगदी तशाच पध्दतीने एका वानराने हनुमानाच्या मूर्तीचे दंडवत घालत दर्शन घेतले. समोरील मूर्ती, बाजूच्या मूर्तीचे दर्शन घेत असलेल्या या वानराचा व्हिडीओ नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. विशेष म्हणजे दंडवत घालून झाल्यानंतर या वानराने आहे त्या जागीच प्राण सोडला.
खरं की काय? रोज ११५ समोसे अन् १२ लीटर कोल्डड्रिंक्स प्यायचा, बटर चिकन खाता खाता आलं मरण
हे हनुमान मंदिर प्राचीन असल्याने या मंदिरात ही घटना घडल्याने अनेकजण वेगवेगळे अर्थ लावत आहेत. शनिवारी भाविक बजरंगबलीची मनोभावे पूजा करतात. शनिवारीच हा वानर मंदिरात आला आणि त्याने दंडवत घालून प्राण सोडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. वानराने प्राण सोडल्यानंतर वानराचे दर्शन घेऊन नागरिकांनी मंदिराशेजारी त्याचे अंत्यसंस्कार पार पाडले.
बोंबला! कोरोनाची लस घ्यायला आलेल्या तरूणालाच नर्सनं केलं प्रपोज; पाहा व्हायरल व्हिडीओ
एखादं वानर हनुमान मंदिरात येते आणि मूर्तीला दंडवत घालून जगाचा निरोप घेतो, ही गोष्ट अनेक अर्थाने नागरिकांसाठी चर्चेची आणि आश्चर्यकारक गोष्ट बनली आहे. गावाबाहेरही या घटनेनंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.