त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तसंच ग्लोईंग त्वचेसाठी घरगुती उपायांपेक्षा चांगले उपाय शोधूनही सापडणार नाही. जर तुम्ही भारतीय असाल तर तुम्हाला हळदीच्या वापराबाबत बरंच काही माहीत असेल. कोणत्याही पदार्थात तसंच फेसपॅक तयार करताना अगदी कमी प्रमाणात हळदीचा वापर केला जातो. स्कॉटलंडची रहिवासी असलेली लॉरेन रेनी हिला हळदीच्या वापराबाबत व्यवस्थित माहिती नव्हती. लॉरेनने ग्लोईंग त्वचा मिळवण्यासाठी हळदीचा फेसमास्क वापरला. या मिश्रणाने हळूहळू तिचा चेहऱ्याला पिवळे डाग पडू लागले. घरगुती उपयांची चांगलीच किंमत तिला मोजावी लागली आहे.
तिने सांगितले की, ''माझा चेहरा खूप पिवळा पडला होता. फक्त माझे ओठ पिवळे पडायचे बाकी होते. त्वचेला बदलण्यासाठी आणि समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी मी घरगुती उपायांचा शोध घेत होते. त्यावेळी मी पाहिलं की हळदीचा फेसमास्क घरगुती सामानापासून बनवता येऊ शकतो. त्यामुळे मुरुम, सुरकुत्या आणि त्वचेची जळजळ रोखण्यास मदत होते. म्हणून मी हळदीचा फेसपॅक लावण्याचा विचार केला. '' लॉरेननं तिच्या १७ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्सनासुद्धा याबाबत माहिती दिली आहे.
जाडेपणाला कंटाळून सोडून गेला पहिला बॉयफ्रेंड; अन् आता नवा पाहून सगळ्यांचीच उडाली झोप
तिने पुढे सांगितले की, ''हा फेसपॅक लावायला सुरूवात केल्यानंतर हळूहळू त्वचेच्या रंगात बदल व्हायला सुरूवात झाली. जेव्हा हा मास्क माझ्या तोंडावरुन काढून टाकला त्यावेळी संपूर्ण चेहरा पिवळा झालेला दिसून आला. फेस मास्क लावून झाल्यानंतर मला माझ्या वडिलांसह शॉपिंगला जायचं होतं. या मास्कमुळे मला चांगला, आकर्षक चेहरा मिळेल असं वाटलं होतं पण त्यामुळे फारसा फायदा झाला नाही.''
वाह मानलं! लठ्ठपणाला कंटाळून जीम जायला लागलं हे जोडपं अन् मग...; फोटो पाहून आजपासूनच जीमला जाल
या मुलीचा पिवळा पडलेला चेहरा पाहून नेटिझन्स तिची खिल्ली उडवताना दिसून येत आहेत. कारण लोकांना ही घटना एखाद्या विनोदाप्रमाणे वाटत आहे. एका युजरने तिचा फोटो पाहून भाष्य केले आहे की, 'जेव्हा लोक म्हणतात की त्यांना त्वचा चमकदार हवी आहे, तेव्हा मला वाटत नाही की त्यांना नंतर तशी त्वचा मिळत असेल.'