किचनचा पाईप तुटणं, लिकेज तर घरातील कधी वापराच्या वस्तू बंद पडणं, प्रत्येकालाच अशा प्रसंगाचा सामना करावा लागत असतो. असंकाही घडलं तर आपण प्लंबरला किंवा वायरमनला बोलावून आपल्या समस्या सोडवतो. ब्रिटनमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
ब्रिटनमधील एका विद्यार्थ्यांच्या घरी प्लंबर पोहोचला त्यावेळी किचनमधील पाईप खराब झाल्यानं त्यानं तो पाईप दुरूस्त करण्याचं काम केलं. त्यानंतर जे झालं त्यावर तुमचा विश्वास अजिबात बसणार नाही. या प्लंबरनं जवळपास ४ लाख रूपयांचे बील बनवून या विद्यार्थ्याला दिलं. हे पाहून एश्ले डगलस नावाचा विद्यार्थी आश्चर्यचकीत झाला.
नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं
एश्ले हा २३ वर्षांचा असून हँट्समध्ये राहतो. द सनशी बोलताना त्यानं सांगितलं की,'' सुरूवातीला मी पाहिलं किचनमध्ये खूप पाणी जमा झालं आहे. कारण सिंकमध्ये जोडलेला पाईल तुटला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर वाहून येऊ लागलं. त्यानंतर मी पी एम प्लंबर सर्विसच्या मेहदी पैरवी यांना फोन करून बोलावले. सुरूवातीला जेव्हा मी खर्चाबाबत विचारलं तेव्हा काहीच सांगितलं नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरं न देताच त्यानं काम करायला सुरूवात केली. पण काम पूर्ण झाल्यानंतर त्यानं माझ्याकडून ३९०० पाऊंड्स ( जवळपास ४ लाख रूपये) मागितले. याच किमतीची पावतीसुद्धा माझ्याकडे दिली.''
नुकत्याच बऱ्या झालेल्या आजींनी डॉक्टरांना मारली मीठी; समोर आला मन हेलावून टाकणारा फोटो
ज्यावेळी एश्लेने एव्हढे पैसे का आकारले?, यााबाबात विचारलं तेव्हा मेहदी यांनी सांगितले की, ''मी माझ्या कामाचे एका तासाचे १ कोटीसुद्धा मागू शकतो. मला नाही वाटत यामुळे कोणाला फरक पडायला हवा. मी माझं ज्ञान आणि विशेषता लक्षात घेता पैसै ठरवतो.'' खरं पाहता हे काम २५ हजारांत होऊ शकलं असतं. पण या प्रकरणात एश्लेला लुबाडण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आता पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करणार आहेत.