लंडन : जगात अनेकदा अनेकांना मौल्यवान वस्तू सापडल्या आहेत. त्यापैकी काही पृथ्वीवरील आहेत, तर काही अंतराळातून पृथ्वीवर आलेल्या आहेत. पण, अनेकदा त्या वस्तुंबद्दल सखोल माहिती नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशाच प्रकारची एक घटना युनायटेड किंगडममधील नॉर्थ वेल्समधून समोर आली आहे. एका मौल्यवान वस्तुमुळे एक व्यक्ती रातोरात करोडपती बनला.
आकाशातून पृथ्वीवर पडताना दिसले'द सन'च्या रिपोर्टनुसार, 38 वर्षीय टोनी व्हिल्डिंग हे रेक्सहॅममध्ये राहतात. एकदा त्यांना आकाशातून ज्वालांचा गोळा पडताना दिसला. याबाबत ते सांगतात की, मी घराच्या अंगणात बसलो होतो, तेव्हा अचानक अकाशातून एक ज्वालांचा गोळा दिसला. तो माझ्या घरापासून काही अंतरावर पडला, मी त्या गोळ्याच्या मागे धावलो पण तो अचानक गायब झाला.
18 महिने शोधलेत्या दिवसानंतर टोनीने त्या उल्काचा शोध सुरू केला. अनेक दिवस त्यांना तो उल्का सापडला नाही. या दरम्यान 18 महिने उलटले आणि अखेर त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले. 18 महिन्यानंतर एका शेतात तो 2lb 4oz आकाराचा उल्का त्यांना सापडला. त्यांना त्या उल्काबद्दल फार माहिती नव्हती.
किंमत ऐकून थक्क झालोयानंतर टोनीने या दगडाची पूर्ण माहिती घेतली आणि त्याची किंमत शोधण्यास सुरुवात केली. काही दिवसांच्या रिसर्चनंतर त्यांना त्या दगडाची किंमत समजली. तो दगड 100,000 पौंड (1 कोटींहून अधिक) असल्याचे त्यांना समजले. ही किंमत ऐकून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.