नवी दिल्ली - लोकांना काही हटक्या, विचार करायला भाग पाडणाऱ्या प्रश्नांची उत्तर द्यायला नक्कीच आवडतात. अशी अनेक भन्नाट कोडी ही सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. काही प्रश्न किंवा काही गोष्टी या गोंधळात टाकणाऱ्या असतात. त्यांची जोरदार चर्चा देखील होते. आजकाल ऑप्टिकल इल्यूजनशी (Optical Illusion) संबंधित फोटोदेखील खूप चर्चेत आहेत. सध्या असाच एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये एका माणसाचा चेहरा दिसतो पण त्यासोबतच त्यात एक रहस्य देखील दडलेलं आहे.
द सन (The Sun) वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडेच Donut_Playz_7573 नावाच्या युजरने रेडीट (Reddit) या सोशल मीडिया साईटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो म्हणजे ऑप्टिकल इल्युजनचं उत्तम उदाहरण आहे. पहिल्यांदा हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला चष्मा लावलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा फक्त समोरचा भाग दिसतो. यामध्ये त्या व्यक्तीचं नाक, तोंड, गळा आणि चष्मा यांचा समावेश आहे. पण, या फोटोमध्ये फक्त व्यक्तीच नाही तर तिच्यासोबत एक इंग्रजी शब्दही लपलेला आहे. बारकाईनं निरीक्षण केल्यास तुम्हाला हा शब्द नक्कीच सापडेल.
नीट पाहिल्यास दिसेल शब्द
जर तुम्ही या चित्राचं डाव्या बाजूनं अगदी बारकाईनं निरीक्षण केलं तर तुम्हाला 'Liar' हा इंग्रजी शब्द सहज वाचता येईल. चष्मा असलेले डोळे आणि नाक एल (L) अक्षरानं बनलेले आहेत, तर नाकातील छिद्र आणि त्याच्या वरचा भाग हा आय (I) पासून तयार झालेला आहे. दोन्ही ओठ मिळून A अक्षर तयार होत तर, हनुवटीपासून घशापर्यंतचा भाग R अक्षराच्या रूपात दिसतो. जरी सोशल मीडियावर यापेक्षाही अधिक रंजक ऑप्टिकल भ्रम असले तरी सध्या मात्र हा फोटो लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.
अनेक युजर्सनी फोटोवर मजेशीर कमेंट करत आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने म्हटलं आहे की, त्याला फोटोमध्ये हॉलिवुड अभिनेता सिलवेस्टर स्टेलॉन दिसत आहे. एकानं म्हटलं आहे, या चित्रात कुणालाही Lair हा शब्द सहजासहजी दिसणार नाही. तर, एकानं म्हटलं आहे की, या फोटोमध्ये 'लेअर' (Lare) हा शब्द लपलेला आहे. खरं तर असे रीडल्स किंवा ऑप्टिकल इल्युजन्स लहान मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी वापरले जातात. मात्र मनोरंजन होत असल्याने आता त्याची चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.