सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारचे पजल आणि चॅलेंज बघायला मिळतात. हे चॅलेंज पूर्ण करता करता आणि चॅलेंज पूर्ण करता करता लोक घामाघुम होतात. अनेकदा तर काही फोटो बघून लोक चक्रावून जातात. त्यांना प्रश्न पडतो की, खरं काय आहे अन् खोटं काय? असाच एक फोटो (Optical Illusion Viral Photo) आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. सोशल मीडियावर व्हायरल (Social Viral Photo) झालेल्या या फोटोत असं दिसतं की, त्यावरील लाईन्स तिरप्या आहेत. पण जर फोटो बारकाईने पाहिला तर वेगळंच काहीतरी दिसतं.
व्हायरल झालेल्या या फोटोकडे तुम्ही पहिल्यांदा बघाल तर तुम्हाला दिसेल की, अनेक रेषा तिरप्या आहेत. पण जेव्हा तुम्ही बारकाईने बघाल तेव्हा सर्व लाईन्स सरळ रेषेत दिसतात. या पजलमध्ये हेच विचारण्यात आलं आहे की, फोटोतील कर्व्ह म्हणजे तिरपी रेषा शोधून दाखवा. मेहंदी रंगाच्या रेषा पूर्णपणे सरळ दिसत आहेत. तर त्याच्या आजूबाजूच्या ग्रे कलरच्या रेषा तिरप्या आहेत.
अचानक जेव्हा फोटो नजर टाकाल तेव्हा असं प्रतीत होतं की, सरळ रेषांमध्ये काही रेषा घुमावदार आहेत. पण असं नाहीये. कारण ग्रे कलरच्या रेषा कन्फ्यूज करत आहेत. यालाच ऑप्टिकल इल्यूजन असं म्हणतात. हा फोटो सहजपणे यूजर्सना चकीत करत आहे. जेव्हा यूजर्स या फोटोतील तिरप्या रेषा शोधत होते तेव्हा भलेभले लोक वैतागले. काही लोकांनी बराच वेळ फोटो बघून हार मानली. बघा तुम्हाला तरी सापडतात का?