अमेरिकेतील शेड एक्वेरिअममध्ये राहणाऱ्या एका बेल्युगा व्हेलने आपल्या पिल्लाला जन्म दिला. व्हेलच्या जन्माची ही पूर्ण प्रक्रिया एका व्हिडीओत कैद करण्यात आली असून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक फारच आश्चर्यचकित झाले आहेत.
पांढऱ्या रंगाची बेल्युगा व्हेल फारच सुंदर दिसते आणि आर्कटिक महासागर, उत्तर अमेरिका, रशिया आणि ग्रीनलॅडच्या समुद्रात आढळते. या माशाचं नाव बेला असून तो अमेरिकेच्या शेड एक्वेरिअममध्ये राहतो. शेड एक्वेरिअमने ट्विटरच्या माध्यमातून लोकांना बेला आई झाल्याची माहिती दिली. बेलाने १५ तासांच्या २१ ऑगस्टला एका पिल्लाला जन्म दिला.
शेड एक्वेरिअमने ही आनंदाची बातमी आणि व्हिडीओ शेअर करत लिहिले की, 'या पिल्लाचा जन्म फार खास पद्धतीने झाला. आधी या पिल्लाचं तोंड बाहेर आलं. सामान्यपणे हे उलटं होत असतं. या पिल्लाचं वजन १३९ पाउंड आणि लांबी ५.३ आहे.
१४ वर्षांची बेला पहिल्यांदाच आई झाली आहे. १.२९ मिनिटाच्या या व्हिडीओत व्हेलच्या डिलेव्हरीवेळी लोकांचा आनंद बघायला मिळतो. पिल्लांचा जन्म होताच सगळेजण आनंदाने ओरडायला लागतात. आता एक्सपर्ट टीमकडून २४ तास बेला आणि तिच्या पिल्लांवर लक्ष ठेवून आहे.
हे पण वाचा :
जन्मताच कुत्रीची पिल्लं मेलीत, तिने मांजरीचे पिल्लं घेतली दत्तक!
बाबो! जगातली सर्वात महागडी मेंढी ३.५ कोटी रूपयांना विकली, पण इतकी किंमत का?
देव तारी त्याला कोण मारी.... भरधाव वेगानं जाणाऱ्या पोलिसाला म्हशीनं दिली धडक; पाहा व्हिडीओ