अनेक ठिकाणी वाहतुकीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे केले जाते. पण भारतात मात्र नियम पाळायचे नसतील तर लोक खूपच जुगाड शोधून काढतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एकाच बाईकवर संपूर्ण कुटुंबाला घेऊन दुचाकीस्वार चालला आहे.
हा फोटो पाहून अनेकांना हसू अनावर झालं आहे.हा व्हिडीओ @ikaveri या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १०० पेक्षा आधिक लाईक्स मिळाले असून हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या १४ सेकंदांच्या व्हिडीओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता सगळ्यात आधी ४ माणसं बाईकवर बसतात त्यानंतर ५ वा माणूस उरतो. त्याला अडजस्ट करण्यासाठी जुगाड केला जातो. एखाद्या रॉडप्रमाणे या माणसाला पकडून घेऊन जातात.
नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं
काही दिवसांपूर्वी असाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कुटुंबातील ६ लोक एकाच एकाच बाईकवर बसून लग्नाला जात होते. आता तुम्ही म्हणाल दोन सीट्सच्या बाईकवर इतके लोक कसे काय बसतील? हा फोटो पाहून तुमची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं की, 'लग्नाला जायचं होतं म्हणून मास्क लावला आणि #Roadsefty ला ठेंगा'.
समोर आलेल्या माहितीनुसार संपूर्ण कुटुंब कर्फ्यूच्या काळात एका लग्नाला हजेरी लावण्यासाठी जात होते. त्यावेळी पोलिसांना त्यांना अडवलं. या सगळ्यांनी मास्क तर लावले होते. पण सोशल डिस्टेंसिंग आणि वाहतुकीच्या नियमांना मात्र चांगलंच धाब्यावर बसवलं होतं. पोलिसांनी सुरूवातीला या लोकांना हात जोडले. त्यानंतर चालान कापून चालकाची समजूत काढून त्याला घरी पाठवण्यात आलं. बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो