Viral Video : जगभरातील जास्तीत जास्त मौल्यवान खनिज पदार्थ डोंगरांमध्ये आणि खाणींमध्ये सापडतात. आता हे खनिज सगळ्यांनाच सहज मिळतात असं नाही. पण काही लोकांचे नशीब इतके जोरावर असतात की, त्यांना चालता-फिरता महागडे खनिज सापडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात बघू शकता की, एका व्यक्तीच्या हाती मोठा खजिना लागला आहे.
अनेकदा लोक काही खोदकाम करतात तेव्हा त्यांना काही मौल्यवान वस्तू किंवा धातु सापडतात. जगात असेच खजिने शोधण्यासाठी अनेक लोक फिरत असतात. ते मेटल डिटेक्टर घेऊन फिरतात आणि त्यांना यात यशही मिळतं. त्यांना अशा अशा गोष्टी सापडतात ज्यांची किंमत खूप जास्त असते.
या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, डोंगरावर एका ठिकाणी थोडंसं खोदण्यात आलं आहे. तिथे काही चमकदार दगड पडलेले दिसत आहेत. व्यक्तीला या चमकदार दगडांचं महत्व माहीत असल्याने तो ते एका प्लास्टिकमध्ये जमा करतो. त्याच्या हातीने काही मोठे तर काही छोटे हिरे लागले आहेत.
तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, हे चमकदार दगड आहेत तरी काय? तर हे हरकिमर प्रकारचे हिरे आहेत. ज्यांची किंमत त्यांच्या चमकण्यावर आणि त्यांच्या पारदर्शी असण्यावर ठरते. हे हिरे फारच स्वच्छ आणि मोठे आहेत त्यामुळे यांना चांगली किंमत मिळेल. इन्स्टावर हा व्हिडीओ geologywonders1 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.