साप आणि एका व्यक्तीचा व्हिडिओ ट्विटरवर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नेमके काय सुरू आहे? यासंदर्भात अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. मात्र, हा व्हिडिओ पाहून कुणीही भयभीत होऊ शकतो. या व्हिडिओमध्ये एक माणून एका स्लोपवर उभा आहे. तो एका सापाला पाण्यातून काढून त्या स्लोपवर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढ्यात एक अजगर त्या स्लोपवून घसरत येताना दिसतो आणि या अजगराला पाहून संबंधीत व्यक्ती घाबरून पाण्यात उडी मारते. हा व्हिडिओ कुणालाही धडकी भरवणारा आहे.
केवळ 20 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता, की एक काळ्या रंगाचा स्लोप आहे. यावर एक माणून उभा आहे. त्याच्या समोरच एक साप पाण्यात जाण्याचा प्रयत्न करतो. यानंतर तो साप पाण्यात जाताच संबंधित व्यक्ती त्या सापाला पाण्यातून बाहेर काढते आणि त्या स्लोपवर ठेवते. मात्र साप पुन्हा पाण्यात जातो. याच वेळी एक मोठा अजगर त्या स्लोपवरून घसरत येतो. या अजगराला पाहून संबंधित व्यक्ती प्रचंड भयभीत होते आणि थेट पाण्यात उडी मारते.
आता आला नवा बँकिंग कायदा, संसदेत मिळाली मंजुरी; ग्राहकांवर होणार असा परिणाम
'The Unexplained' नावाच्या एका ट्विटर युझरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यानंतर, हा व्हिडिओला आतापर्यंत 3.5 लाखहून अधिक लोकांनी बघितला आहे. तर अनेकांनी शेअरही केला आहे. एवडेच नाही, तर या व्हिडिओवर अनेक जण आपल्या रिअॅक्शन्सदेखील देत आहेत.
EPFO आणि ESICच्या बदलांवर शिक्कामोर्तब, नोकरदारांना मिळणार 5 मोठे गिफ्ट