लॉकडाऊनच्या काळात अनेक प्राण्यांचे आणि पक्ष्याचे व्हायरल व्हिडीओज तुम्ही सोशल मीडियावर पाहीले असतील. ऐरवी गजबजलेले असणारे रस्ते लॉकडाऊनच्या काळात पूर्णपणे मोकळे होते. यामुळे माणसांना घाबरून पळत असलेल्या प्राण्यांना मोकळ्या रस्त्यांवर मुक्त संचार करायला सुरूवात केली. शहामृग हा जगभरातील सर्वांत मोठा पक्षी आहे. हा पक्षी उडू शकत नाही, पण सर्वांत वेगाने धावू शकतो. हे आतापर्यंत तुम्ही ऐकले असेल. सध्या असाच एका शहामृगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहामृग खूप कमीवेळा रस्त्यावर पाहायला मिळतात.
तुमचा विश्वास बसणार नाही पण या व्हिडीओमध्ये शहामृग सायकल रेसिंग करणाऱ्या माणसांबरोबर धावताना दिसत आहे. विशेष म्हणजे सगळ्या सायकल स्वारांना मागे टाकत शहामृग ही शर्यत जिंकतो. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, सायकल रेसिंगच्या ट्रॅकवर काही माणसं सायकलिंग करत असताना हा शहामृग मध्येच येऊन त्यांच्याबरोबर धावतो आहे, हा मजेशीर व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.
व्हिडीओ दक्षिण आफ्रिकेतील असून यामध्ये हा शहामृग सायकलस्वारांबरोबर शर्यत लावताना दिसत आहे. डॅनिअल रेस नावाच्या सायकलस्वाराने आपल्या कॅमेऱ्यामध्ये हा व्हिडीओ शूट केला आहे. हा शहामृग केवळ या सायकल रेसरच्या बरोबरीने धावत नाही तर त्यांना मागे सोडत ही रेस जिंकतो. सुरुवातीला डाव्या बाजुने धावणारा शहामृग एकदम उजव्या बाजुला येवून धावू लागल्याने एका क्षणासाठी पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकाच्या मनात वाढते. विमान प्रवासादरम्यान महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
या व्हिडीओबाबत माहिती दिली आहे की, सायकलस्वारांचा प्रवास सुरु असताना अचानक त्यांच्यामध्ये हे शहामृग आलं. त्यांच्या सायकल बरोबर शहामृग देखील धावू लागलं. त्यामुळे सुरुवातीला त्यांना याची भीती वाटली. हे शहामृग त्यांच्यावर हल्ला करेल की काय अशी भीती त्यांना होती. पण त्यानंतर हे शहामृग त्यांच्या सायकलबरोबर धावू लागलं. त्यामुळे सायकलस्वारांमध्येही आनंदाची भावना निर्माण झाली. अरे व्वा! बाबा का ढाब्यावर खवय्यांची तुफान गर्दी, रडणाऱ्या चेहऱ्यावर फुललं हसू, पाहा व्हिडीओ