Baby Elephant Rescue Video: एका हत्तीचं पिल्लू दरीत पडलं होतं. त्याच्या रेक्यूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर शेअर केला आणि या व्हिडीओ 46 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे. या व्हिडीओत बचाव दल जेसीबीच्या मदतीने खोदकाम करून हत्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी हत्तीच्या पिल्लांला आधी दोरीने बांधलं आणि त्याला दरीतून बाहेर काढलं.
कासवान यांच्या पोस्टनुसार, अधिकाऱ्यांना जवळपास रात्री 1 वाजता हत्तीचं पिल्लू दरीत पडल्याची सूचना मिळाली होती. ते रात्रीच एकत्र आले आणि चार तासांच्या मोठ्या प्रयत्नानंतर हत्तीचं पिल्लू ते बाहेर काढू शकले. त्यानंतर हत्तीच्या पिल्लाला त्याच्या टोळीकडे सुरक्षित सोडण्यात आलं. IFS अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'सकाळी 1 वाजता टिमला हत्तीचं पिल्लू दरीत पडल्याची सूचना मिळाली होती. त्यानंतर बराच वेळ बचाव अभियान चालवण्यात आलं. सकाळी 5 वाजता हे अभियान थांबलं'.
या व्हिडीओला 3 हजार लाइक्स आणि 250 पेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. यूजर्सने जसा हा व्हिडीओ पाहिला त्यांनी वन विभाग टिमच्या कर्मचाऱ्यांचं भरभरून कौतुक केलं. कमेंट बॉक्समध्ये लोक भरभरून कमेंट्स करत आहेत. काही दिवसांपूर्वी सुंदरवनमध्येही एक रॉयल बंगाल टायगरचं रेक्स्यू करण्यात आलं होतं. त्याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात एका वाघाला जहाजातून पाण्यात उडी घेताना बघता येतं. त्याला सुंदरवन जंगलात सोडण्यासाठी नेलं जात होतं.