Viral Video : जगभरात वेगवेगळ्या गोष्टींच्या शौकीन लोकांची कमतरता नाही. त्यासाठी ते कितीही पैसे खर्च करतात. काही लोकांना लक्झरी लाइफस्टाईल आवडते तर कुणाला साधी. पण काही लोक फारच अजब गोष्टींचे शौकीन असतात. अशाच एक व्यक्तीच्या अजब टॉयलेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल की, टॉयलेटमध्ये अशा गोष्टी कोण ठेवतं भौ? असं वाटत आहे की, ही व्यक्ती लिव्हिंग रूम आणि टॉयलेटमधील फरक विसरली आहे.
Netizeniseng नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ज्यात तुम्ही या अजब टॉयलेटचा नजारा बघू शकता. इथे टॉयलेट सीट आणि बकेट तर ठीक आहे. पण इथे मागे सुंदर पेंटिंग टांगलेली आहे. इतकंच नाही तर या टॉयलेटमध्ये एक होम थिएटर, लायटिंगही लावली आहे. इतकंच नाही तर भींतीवर एक घड्याळही लावलं आहे. सोबतच एक फॅनही लावला आहे. जे फारच अजब वाटत आहे.
हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. काही दिवसातच या व्हिडिओला 1 लाख व्ह्यूज मिळाले. पण लोक या टॉयलेटबाबत फार कन्फ्यूज झाले आहेत. लोक यावर अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, 'हे टॉयलेट आहे की, लिव्हिंग रूम', दुसऱ्याने लिहिलं की, 'फक्त स्नॅक्सची कमतरता आहे', तिसऱ्याने लिहिलं की, 'इथे गेल्यावर बेडरूमसारखा फील येईल'.