VIDEO : भारतात इथे आहे जगातली सर्वात मोठी कढई, बघा काय बनवत असतील यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 05:22 PM2021-10-19T17:22:32+5:302021-10-19T17:26:40+5:30

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ फूड ब्लॉगर अमर सिरोहीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अमरने साधारण ७ मिनिटांचा पूर्ण व्हिडीओ आपल्या पेजवर शेअर केला.

Viral Video : The worlds biggest Kadhai is here in India, know what is made in it | VIDEO : भारतात इथे आहे जगातली सर्वात मोठी कढई, बघा काय बनवत असतील यात!

VIDEO : भारतात इथे आहे जगातली सर्वात मोठी कढई, बघा काय बनवत असतील यात!

googlenewsNext

जगभरात आपल्याला वेगवेगळ्या अजब वस्तू बघायला मिळतात. भारतातही अशा अनेक अजब वस्तू आहेत. ज्यांबाबत फार कमी लोकांना माहीत आहे. प्रत्येक घरात जेवण तयार करण्यासाठी किंवा काही तळण्यासाठी कढईचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की, जगातली सर्वात मोठी कढई कुठे आहे. भारतातील अजमेर शरीफ दरगाहमध्ये असा दावा केला गेला आहे की, इथे जगातली सर्वात मोठी कढई आहे. 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ फूड ब्लॉगर अमर सिरोहीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अमरने साधारण ७ मिनिटांचा पूर्ण व्हिडीओ आपल्या पेजवर शेअर केला. काही तासांमध्येच २ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओत दावा करण्यात आला आहे की, या कढईचं वजन ४८०० किलोग्रॅम आहे आणि ही भारतातील सर्वात मोठी कढई आहे. आजपासून साधारण ४५० वर्षाआधीपासून बादशाह अकबराच्या काळापासून ही कढई इथे आहे आणि अजूनही लंगर या कढईत तयार केलं जातं.

या कढईबाबत अमरने सांगितलं की, दरगाहमध्ये दर्शनासाठी येणारे भाविक आपल्या श्रद्धेने कढईत तांदूळ, डाळ आणि पैसे टाकतात. पैसे काढल्यानंतर कढईतील तांदूळ-डाळ काढली जाते. यानंतर कढईत जाफरानी राईस बनवला जातो. ही प्रक्रिया सुरू करण्याआधी साफ-सफाई केली जाते. असं सांगितलं जातं की, हे ट्रेडिशन बादशाह अकबरच्या काळापासून ४४० वर्षापेक्षा अधिक काळापासून चालत आलं आहे. जाफरानी राइस तयार करताना पाणी, तांदूळ, मैदा, ड्राय फ्रूट्स, साखर, तूप टाकलं जातं. हे तयार झाल्यावर दर्शनासाठी आलेल्या लोकांमध्ये वाटलं जातं.
 

Web Title: Viral Video : The worlds biggest Kadhai is here in India, know what is made in it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.