जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत, जेथे आजही महिला आणि मुलींसंदर्भात लोक अत्यंत घृणास्पद विचार करतात. केवळ भारतच नाही तर, असे अनेक देश आहेत, जेथील काही भागांत अत्यंत वाईट आणि घृणास्पद कुप्रथा दिसून येतात. यातच चीनमधून एक अशी घटना समोर आली आहे, जी वाचून तुम्हालाही हादरा बसल्यावाचून राहणार नाही. येथे एक महिलेला कथितरित्या तब्बल पाच तासांची व्हर्जिनिटी टेस्ट द्यावी लागली.
या विधीनंतरच वधू...-ही घटना पूर्व चीनच्या जियांग्शी प्रांतातील आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका वृत्तानुसार, येथील एक मुलगी लग्नानंतर आपल्या सासरी पोहोचली. तेव्हा तिला तिच्या खुल्या पायांनी घरच्या जमिनीला स्पर्श करू दिला गेला नाही. यावेळी तिला सांगण्यात आले, की एक विधी पूर्ण करावा लागेल. त्याशिवाय सासरच्या घरात पाय ठेवता येणार नाही.
ससरच्या लोकांसाठी सौभाग्य! यावेळी सांगण्यात आले, की असे केल्याने वधूची व्हर्जिनिटी टेस्ट होईल आणि तिच्या सर्व वाईट कामांचे रुपांतर चांगल्या कामात होईल. ती स्वतः सासरच्यालोकांसाठी सैभाग्यशाली ठरेल आणि त्यांचा विकास होईल. या विधीदरम्यान वधूचे पाय जमीनीला लागू नये म्हणून तिला तब्बल पाच तास एक टोकरीत बसवण्यात आले होते.
फोटोही आला समोर -साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या या वृत्तात, वधूचे काही फोटोही समोर आले आहेत. यात, हा विधी पार पाडण्यासाठी तिला किती त्रास होत आहे, हेही दिसत आहे. हे फोटो पाहून लोक संतापले आहेत. एवढेच नाही, तर चीनमधील लोकही, ही अत्यंत वाईट घटना असल्याचे म्हणत आहेत.