रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध काही थांबायचं नावंही घेत नाहीये. अशात रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांना वेगवेगळ्या देशांमधून विरोधाचा सामना करावा लागत आहे. अशात रशियातील अनेक सीक्रेट गोष्टींची चर्चा होत आहे. रशियात एक असं तुरूंग आहे ज्यात एकदा जर कैद्याला टाकलं तर तो मरेपर्यंत बाहेर येऊ शकत नाही. या तुरूंगाचं नाव आहे ब्लॅक डॉल्फिन (Black Dolphin).
रशियात असलेल्या तुरूंगाच्या या गुलाबी रंगाच्या इमारतीला बघून कुणालाही हेच वाटेल की, ही एखादी नॉर्मल बिल्डींग आहे. पण मुळात या जेलमध्ये रशियातील सर्वात खतरनाक कैद्यांना ठेवलं जातं. या जेलमध्ये रेपिस्ट, लहान मुलांवर अत्याचार करणारे गुन्हेगार, खूनी आणि मनुष्यांचं मांस खाणारे गुन्हेगार ठेवले जातात. 'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, जर रशियात एखाद्याने असा गुन्हा केला जो माफी लायक नाही तेव्हा त्या कैद्याला या जेलमध्ये पाठवलं जातं. या जेलमध्ये आलेला कोणताही कैदी जीवंत बाहेर येऊ शकत नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, या जेलशिवाय रशियातील इतर जेलमधील कैद्यांना भलेही जामीन मिळतो, पण ब्लॅक डॉल्फिन जेलमध्ये एकदा जर कुणी गेलं तर त्याचं बाहेर निघणं अशक्य होतं. कैद्याच्या मृत्यूनंतरच त्याला जेलमधून बाहेर काढलं जातं. या जेलमध्ये सध्या ७०० कैदी आहेत. या कैद्यांना जामीन मिळत नाही. त्यांना जन्मठेपेची शिक्षा मिळते.
तसेच या जेलमधून जर एखाद्या कैद्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते. जेणेकरून त्यांना त्यांच्या सेलशिवाय दुसरं काही बघता येऊ नये.