ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांनी आपण सार्वजनिक ठिकाणी असल्याचे भान ठेवायला हवे. त्यांच्यामुळे कोणा दुसऱ्याला कोणताही त्रास होऊ नये किंवा लाज वाटू नये. इंग्लंडच्या रेल्वेने आपल्या प्रवाशांना एक सल्ला दिला आहे. हा सल्ला जगभरात चर्चेत आला आहे.
डेली स्टार न्यूजच्या वेबसाईटनुसार ब्रिटनच्या रेल्वे कंपनीने प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करताना किंवा स्टेशनवर असताना पॉर्न फिल्म पाहून करा असे म्हटले आहे. नॉर्दर्न रेल्वेने कोणत्याही प्रकारचा व्हल्गर कंटेंट पाहण्यास मनाई केली आहे. जर तुम्हाला असे काहीतरी पहायचे असेल तर तुम्ही तुमचे घर येण्यापर्य़ंतची वाट पहा, असे रेल्वेने म्हटले आहे.
ही रेल्वे प्रवाशांना स्थानकांवर आणि रेल्वेमध्ये मोफत वायफाय उपलब्ध करते. याचे कारण प्रवाशांना त्यांचे मनोरंजन करता येईल, काम करता येईल असे आहे. परंतू काही प्रवासी हे रेल्वेमध्ये किंवा स्टेशनवर याचा गैरवापर करताना दिसतात. यामुळे रेल्वेने हा सल्ला दिला आहे.
काही मजकूर असा असतो की तो महिला आणि मुलांच्या उपस्थितीत पाहण्य़ा लायक नसतो. जर एखादी गोष्ट कामाच्या ठिकाणी योग्य नसेल तर ती आमच्या स्थानकांवर किंवा ट्रेनच्या आत पाहणे योग्य नाही. कंपनी किमान फिल्टर लावून इंटरनेट उपलब्ध करते. परंतू प्रवासी याचा फायदा उठवतात, असे रेल्वेच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.