आजकाल प्लास्टिकचा वापर फार जास्त वाढला आहे. पण त्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होत आहे. काही ठिकाणी प्लास्टिकवर बंदी आणली गेली असली तरी प्लास्टिक पूर्णपणे वापर काही बंद झालेला नाही. लोकांमध्ये अजूनही प्लास्टिक बंदीबाबत जागरूकता करण्याची गरज आहे. उत्तराखंडच्या मसूरीमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जागरूकता करण्यासाठी एक चांगली संकल्पना समोर आणली गेली.
मसूरीच्या बंग्लोतील कांडी गावात १५ हजार प्लास्टिकच्या बेकार बॉटल्सपासून एक रंगीत भिंत तयार केली गेली आहे. या भिंतीला 'वॉल ऑफ होप' म्हणजेच आशेची भिंत असं नाव देण्यात आलं आहे. ही भिंत १५०० फूट लांब आणि १२ फूट उंच आहे.
या भिंतीचं डिझाइन सुबोध केरकरने तयार केलं आहे. त्यांनी सांगितले की, गाव, शहरांना आम्ही प्लास्टिक मुक्त करण्यासाठी काम करत आहोत. ही भिंत तयार करून आम्हाला जनतेला संदेश द्यायचा आहे की, प्लास्टिकचा वापर कमी करा. त्यांनी स्थानिक लोकांना हेही सांगितले की, प्लास्टिक खासकरून डोंगरांसाठी नुकसानकारक आहे.
या वॉलसमोर एक संगीत कार्यक्रमही सादर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये सितारवादक अग्नि वर्मा सितार वादन करत आहेत. या उपक्रमाचं चांगलंच कौतुकही केलं जात आहे.