War for Watermelon : जगाच्या इतिहासात तुम्ही अनेक युद्ध आणि लढायांबाबत ऐकलं किंवा वाचलं असेल. भारतीय इतिहासात अनेक युद्ध झालीत. ज्यातील अनेक युद्ध प्रसिद्ध आहेत. यातील जास्तीत जास्त लढाया या दुसऱ्या राज्यांवर सत्ता स्थापन करणं यासाठी झाल्या. पण १६४४ मध्ये एक युद्ध केवळ एका कलिंगडासाठी झालं होतं. आजपासून साधारण ३७६ वर्षाआधी झलेल्या या युद्धात हजारो सैनिक मारले गेले होते.
जगातली ही पहिली लढाई आहे जी केवळ एका फळासाठी लढली गेली होती. इतिहासात हे युद्ध 'मतीरे की राड' नावाने नोंदवलं आहे. राजस्थानच्या अनेक भागांमध्ये कलिंगडाला मतीरा नावाने ओखळलं जातं आणि राडचा अर्थ लढाई होतो. आजपासून ३७६ वर्षाआधी १६४४ मध्ये हे अनोखं युद्ध झालं होतं. कलिंगडासाठी लढण्यात आलेली ही लढाई दोन राज्यांच्या लोकांमध्ये लढली गेली होती.
त्यावेळी बीकानेरच्या सीलवा गाव आणि नागौरच्या जाखणिया गावाच्या सीमा एकमेकांना लागून आहेत. या दोन्ही संस्थानांच्या शेवटच्या सीमेंवर ही गावं होती. बीकानेर संस्थानाच्या सीमेत एक कलिंगडाचं झाड लागलं होतं आणि त्याच झाडाला लागलेलं कलिंगड हे नागौर संस्थानाच्या सीमेत वाढलं होतं. हेच युद्धाचं कारण ठरलं.
सीलवा गावातील लोकांचं मत होतं की, झाड त्यांच्या सीमेत आहे त्यामुळे फळावरही त्यांचा अधिकार आहे. तेच नागौरमधील लोक म्हणत होते की, फळ त्यांच्य सीमेत आहे त्यामुळे ते त्यांचं आहे. या फळावरील अधिकारामुळे दोन संस्थांनामध्ये लढाई सुरू झाली आणि ही लढाई खूप वाढली.
सिंघवी सुखमलने नागौरच्या सेनेचं नेतृत्व केलं आणि रामचंद्र मुखियाने बीकानेरच्या सेनेचं नेतृत्व केलं. सर्वात मोठी बाब म्हणजे दोन्ही संस्थानांच्या राजांना या युद्धाबाबत कानोकान खबर नव्हती. बीकानेरचे राजा करणसिंह एका अभियानावर होते तर नागौरचे राजा राव अमरसिंह मुघल साम्राज्याची सेवा करत होते.
हे दोन्ही राजे मुघल साम्राज्याच्या भाग होते. जेव्हा या लढाईबाबत दोन्ही राजांना समजलं तेव्हा त्यांनी यात मुघल राजाला हस्तक्षेप करण्यास सांगितला. जोपर्यंत ही बाब मुघल शासकापर्यंत पोहोचली तोपर्यंत युद्धाला सुरूवात झाली होती. या युद्धात बीकानेर संस्थानाचा विजय झाला. असं सांगितलं जातं की या युद्धा दोन्हीकडील हजारो लोक मारले गेले होते.