मुव्ही पाहायला कोणाला आवडत नाही. मात्र मुव्ही पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातले पैसे खर्च करावे लागतात. समजा जर तुम्हाला कुणी असं म्हटलं की मुव्ही पाहण्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला पैसे दतो तर तुमची रिअॅक्शन काय असेल? तुम्हाला धक्काच बसेल. असं होऊच शकत नाही असंच तुम्ही म्हणाल पण हे खरं आहे. तुम्हाला मुव्ही मिळण्याचे पैसे मिळतील तेही जवळपास एक लाख.
फाइनॅन्सबज या कंपनीनं चित्रपट पाहण्यासाठी १ हजार ३०० डॉलर्स म्हणजे ९५ हजार रुपये देण्याची तयारी दाखवली आहे. फक्त अट एकच यासाठी १३ हॉरर मुव्हीज बघायचे आहेत. चित्रपट पाहताना एखाद्या व्यक्तीचा हार्ट रेट काय आहे याची माहिती कंपनीला हवी आहे. लो बजेट फिल्म आणि हायबजेट फिल्ममध्ये कंपनीला तुलना करायची आहे. या कंपनीनं यासाठी नोकरीची जाहिरातच काढलीय. त्यात असं म्हटलंय की कंपनीला १३ हॉरर चित्रपट बघणाऱ्या हॉरर फिल्म अॅनालिस्टची गरज आहे. निवडण्यात आलेला उमेदवार फिटबिट डिवाइसने हार्ट रेट चेक करेल. तसेच यासाठी त्याला ५० डॉलरचं गिफ्टकार्डही देण्यात येईल.
या आहेत त्या १३ हॉरर मुव्हिजएमिटीविले हॉरर, अ क्वाइट प्लेस, अ क्वाइट प्लेस पार्ट २, कँडीमैन, इंसिडियस, द ब्लेयर विच प्रोजेक्ट, सिनिस्टर, गेट आउट, द पर्ज, पॅरानॉर्मल अॅक्टिविटी और हॅलोवीन चित्रपटाचा २०१८चा रिमेक.