अनेकदा माणूस आत्मविश्वासात अर्विभावामध्ये समोरच्या माणसाला कमी लेखतो. कधी कधी जे दिसतं तसं नसतं हेदेखील समजू शकत नाही. तुम्ही एखाद्याबद्दल जो विचार करता तो तसाच निघेल याची शाश्वती नाही. हे सगळं सांगण्याची गोष्ट म्हणजे काही पैलवान लढाई करत होते, या दोन पैलवानामध्ये वाद झाला, म्हणून एक भगव्या वस्त्रात बाबा तडजोड करण्यासाठी पुढे सरसावला.
बाबा मध्यस्थी करण्यासाठी आले असता या पैलवानानं त्यांनाही सोडलं नाही, मग काय जे झालं ते बघून इतरांनाही धक्का बसला, या बाबाने पैलवानाला उचलून आपटलं, त्यानंतर कोणीही समोर उभं राहिलं नाही. आपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याखाली कॅप्शन लिहिली आहे की, कोणत्याही पुस्तकाला त्याच्या कव्हरवरुन जज करु नये. या व्हिडीओत पाहू शकता की, कशाप्रकारे एक भगव्या वस्त्रातील बाबा पैलवानांना मैदानातून आपटून मैदानात पळवतो.
सध्या व्हिडीओ कोणत्या भागातला आहे याची पुष्टी नाही, परंतु जवळपास ९ हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. लोकांनी या व्हिडीओला शेअर करत कोणत्याही व्यक्तीला कपड्यावरुन जज करु नका असा सल्ला दिला आहे.