वॉशिंग्टन : १९११ मध्ये अंटार्टिकातील या ‘रक्ताच्या नदीचा’ सर्वप्रथम शोध लागला होता. आॅस्ट्रेलियन भूूगर्भशास्त्रज्ञ ग्रिफिथ टेलर यांनी ही अनोखी हिमनदी शोधली होती. हिमनदीतून स्रवणाऱ्या पाण्याच्या लाल रंगाचे त्यांना प्रचंड कुतूहल वाटले. लाल रंगाच्या अत्यंत सूक्ष्म शेवाळामुळे पाणी लाल होत असेल, असे त्यांना आधी वाटले; मात्र २००३ मध्ये त्यांचा हा निष्कर्ष चूक असल्याचे सिद्ध झाले. या पाण्यात आयर्न आॅक्साईड प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे त्याचा रंग लाल असल्याचे नव्या संशोधनात आढळले. आॅक्सिडाईस्ड आयर्नमुळे येथे पाणी लाल रंगाचे येते, असा नवा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी पुराव्यानिशी मांडला. संशोधकांनी या गूढ हिमनदीतून स्रवणाऱ्या पाण्याबाबत नवे निष्कर्ष मांडले आहेत. हे पाणी एका विशाल सरोवरातून येत आहे, असे कोलोरॅडो कॉलेज आणि अलास्का विद्यापीठाच्या नव्या अभ्यासात आढळून आले. हे सरोवर लाखो वर्षांपासून बर्फाच्या खाली दबलेले होते. अंटार्टिका अनेक रहस्यांची खाण आहे.
हिमनदीतून पाण्याऐवजी येते रक्त
By admin | Published: April 29, 2017 7:13 AM