नैसर्गिकपणे टोमॅटोमध्ये अॅसिड असतं. त्यामुळे टोमॅटो सॉस हे केवळ खाण्याच्या नाही तर वेगवेगळ्या वस्तूंवरील डाग दूर करण्याच्याही कामात येतं. वस्तूंवरील डाग दूर करण्याच्या वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या तुलनेत हा सोपा आणि स्वस्त उपाय आहे. चला जाणून घेऊ याचे फायदे...
१) तांब्याच्या भांड्यांवरील डाग
तांब्याच्या वेगवेगळ्या वस्तूं घराची सुंदरता वाढवण्यासाठी वापरल्या जातात. तांब्याच्या भांड्यात तयार करण्यात आलेल्या पदार्थांमुळे आरोग्यही चांगलं राहतं. पण या भांड्यांची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. यावर लवकरच हिरवे किंवा काळे डाग पडू लागतात. अशावेळी टोमॅटो केचपच्या मदतीने ही भांडी तुम्ही स्वच्छ करु शकता. यासाठी तुम्हाला केचप तांब्याच्या भांड्यावर लावून १० ते १५ मिनिटे तसेच ठेवायचे आहे. त्यानंतर एका मुलायम कापड घेऊन गरम पाण्याच्या मदतीने ही भांडी स्वच्छ करा. न जाणारे डाग घालवण्यासाठी केचपमध्ये थोडं मीठ टाका त्याने अधिक फायदा दिसेल.
२) पितळेच्या भांड्यांवरील डाग
पितळेच्या भांड्यांवर काळे डाग पडू नये म्हणूनही टोमॅटो केचपचा वापर तुम्ही करु शकता. भारतीय घरांमध्ये देवांच्या मुर्ती अनेक शोभेच्या वस्तून पितळापासून तयार केलेल्या असतात. त्याचेही डाग टोमॅटो केचपने जातात.
३) चांदीला चमकदाक करण्यासाठी
चांदीच्या वस्तू या हवेच्या संपर्कात आल्या तर त्यावर काळे डाग पडतात. चांदी हवेच्या संपर्कात येऊन कॉपर ऑक्साइड तयार करतं ज्याने चांदीचा चमकदारपणा कमी होतो. त्यामुळे चांदीच्या वस्तू काही वेळासाठी टोमॅटो केचपमध्ये बुडवून ठेवा. या वस्तू जास्त वेळ केचपमध्ये ठेवू नका कारण केचपमधील अॅसिड चांदीच्या वस्तूंच नुकसान करु शकतं. जर चांदीच्या या वस्तू डिझायनर असेल तर ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा.
४) कुकवेअर स्वच्छ करण्यासाठी
अनेकदा जेवण बनवताना गॅसच्या शेगडीचं बर्नर जळत असावं आणि ते स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला किती वेळही लागत असेल. अशात टोमॅटो केचपच्या मदतीने जळालेलं बर्नर तुम्ही स्वच्छ करु शकता. त्यासाठी बर्नर पाण्यात चांगल्याप्रकारे उकळून घ्या. त्यावर केचप टाका आणि काही वेळाने पाण्याने धुवून घ्या. केचपमधील एसिटीक अॅसिड त्यावरील कार्बन स्वच्छ करेल.
५) कार स्वच्छ करण्यासाठी
कार स्वच्छ करण्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे आधी साबणाने आणि नंतर पाण्याने स्वच्छ करणे. त्यानंतर तुम्ही मुलायम कापडाच्या मदतीने केचपने कार घासल्यास आणि नंतर पाण्याने धुतल्यास कार चमकेल. यासोबतच अनेक लोखंडाच्या वस्तूंवरील गंज काढण्यासाठी केचपचा वापर करु शकता.