शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

महिला मागे सोडून गेली एक बंगला अन् कोट्यावधी रूपयांची संपत्ती, मृत्यूपत्रात ठेवली एक अट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 2:58 PM

नॅन्सी सॉयरल नावाच्या या महिलेने आपली संपत्ती सांभाळण्यासाठी आधीच व्यवस्था केली होती. तिने तिच्या मृत्यूपत्रात असं काही लिहिलं होतं की, तिची प्रॉपर्टी कुणालाही मिळू शकत नव्हती.

Woman leaves substantial inheritance: अमेरिकेच्या फ्लोरिडामधून एक अजब घटना समोर आली आहे.  इथे राहणारी एक महिला तिच्या कोट्यावधी रूपयांची प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी एका व्यक्तीचा शोध घेत आहे. या महिलेला जवळचा किंवा दूरचा कुणीही नातेवाईक नाही. तिला काही मित्र होते, पण तिला त्यांना आपली संपत्ती सोपवायची नाही. 84 वर्षीय या महिलेचं काही दिवसांआधी निधन झालं. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात आणि मग कोर्टात पोहोचलं. 

नॅन्सी सॉयरल नावाच्या या महिलेने आपली संपत्ती सांभाळण्यासाठी आधीच व्यवस्था केली होती. तिने तिच्या मृत्यूपत्रात असं काही लिहिलं होतं की, तिची प्रॉपर्टी कुणालाही मिळू शकत नव्हती.

एका रिपोर्टनुसार, नॅन्सी तिच्या मागे साधारण 20 कोटी रूपयांपेक्षा जास्तीची संपत्ती सोडून गेली आहे. आपल्या मृत्यूपत्रात तिने अट ठेवली की, जो तिच्या सात मांजरी क्लियोपेट्रा, गोल्डफिंगर, लियो, मिडनाइट, नेपोलियन, स्नोबॉल आणि स्क्वीकी यांचा चांगला सांभाळ करेल तोच तिच्या संपत्तीचा मालक होऊ शकतो. 

ही केस सांभाळणाऱ्या वकिलांनुसार, नॅन्सने लिहिलं की, तिच्या मांजरींना तिचं घर टाम्पा हाऊसमध्ये मरेपर्यंत ठेवावं लागेल. कारण त्या दुसरीकडे गेल्यातर नीट राहणार नाहीत. याच अटीमुळे कुणीही हे घर खरेदी करत नाहीये. म्हणजे जोपर्यंत मांजरी जिवंत आहेत तोपर्यंत घराचा ताबा कुणालाच मिळणार नाही. 

एका अधिकाऱ्यानुसार, नॅन्सीने तिच्या मांजरींचा जीवनभराचा खर्चही वेगळा ठेवून गेली आहे. जेणेकरून त्यांची उपासमार होऊ नये. ही फारच वेगळी घटना आहे. नॅन्सीच्या मृत्यूनंतर मांजरी काही दिवस एकट्या राहिल्या. केस कोर्टात गेल्यावर कोर्टाने आदेश दिला की, मांजरींना अशा ठिकाणी नेलं जावं जिथे त्यांची देखरेख व्यवस्थित होईल. 

केसच्या सुनावणी दरम्यान सांगण्यात आलं की, इतक्या मोठ्या घरात मांजरींना एकटं सोडता येणार नाही. नॅन्सीच्या मृत्यू पत्रातील अटी कठिण आहेत. पण मांजरींची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी योग्य व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. काही रिपोर्ट्सनुसार, मांजरींना लवकर दत्तक दिलं जाईल.

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके