भारतात हुंड्याची प्रथा (Dowry System) अनेक वर्षांपासून चालत आली आहे. मात्र, बदलत्या काळासोबत असे अनेक लोक आहेत ज्यांचा कल ही प्रथा बंद करण्याकडे दिसून येतो. आजचे काही तरूण स्मार्ट आणि समजदार झाले आहे की, ते लग्नावेळी स्वत: या कुप्रथेविरोधात आवाज उठवतात. कॅच न्यूजमध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Wedding) झालेल्या एका लग्नात असंच काहीसं बघायला मिळालं. इथे नवरदेवाने हुंडा घेण्यास नकार दिला म्हणून सासरच्या लोकांनी असं काही केलं की, नवरदेव बघतच राहिला.
नवरदेवाने हुंडा घेण्यास दिला नकार
काही ठिकाणी आजही मुलाकडून मोठ्या हुंड्याची मागणी केली जाते. इतकंच काय तर हुंड्याची मागणी पूर्ण झाली नाही तर नवरीला त्रास देणे आणि जीवे मारणे अशाही घटना घडतात. मात्र, पश्चिम बंगालमधील ही घटना फारच वेगळी आहे. पश्चिम बंगालच्या मिदनापूरमध्ये राहणारा सूर्यकांत बरीक हा शिक्षक आहे. त्याचं लग्न तेथीलच प्रियंका बेजसोबत जुळलं. सूर्यकांतने आधीच स्पष्ट केलं होतं की, त्याला हुंडा अजिबात नको. (हे पण वाचा : पाठवणी झाल्यावर तासाभरात नवरीला घेऊन वरात मागे फिरली; कुटुंबियांची धाकधूक वाढली; पण...)
वरात पोहोचल्यावर मिळालं सरप्राइज
नवरदेवाने नकार दिल्यावरही मुलीकडच्या लोकांना नवरदेवाला यादगार असं गिफ्ट द्यायचं होतं. त्यामुळे त्यांनी सूर्यकांतचं ऐकत गाडी किंवा दागिने गिफ्ट करण्याऐवजी काहीतरी वेगळं देण्याचा निर्णय घेतला. जेव्हा वरात मंडपात पोहोचली तर तेथील नजारा पाहून सगळेच हैराण झाले. नवरीकडच्या लोकांनी नवरदेवाला असं गिफ्ट दिलं होतं ज्याचा त्यांनी विचारही केला नव्हता. नवरीकडील लोकांनी गिफ्ट म्हणून नवरदेवाला एक लाख रूपयांची पुस्तके दिली.
पाहुण्यांनीही आणली पुस्तके
नवरदेवाला रविंद्रनाथ टागोर, शरत चंद्र चट्टोपाध्याय, बंकिम चंद्र चॅटर्जी यांसारख्या मोठ्या बंगाली लेखकांची पुस्तके देण्यात आली. सोबतच त्याला हॅरी पॉटर सीरीजची पुस्तकेही दिली. नवरीच्या परिवाराने ही पुस्तके १५० किलोमीटर दूरून मागवली होती. या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांनाही विनंती करण्यात आली होती की, त्यांनी किंमती गिफ्टऐवजी नवरी-नवरदेवासाठी पुस्तके आणावी.