चांगले आरोग्य राखण्यासाठी जंक फूड टाळावे आणि रोजचा व्यायाम करावा असे अनेकदा सांगितले जाते आणि हे खरंही आहे. पण एका फिटनेस ट्रेनरचा दावा आहे की त्याने वजन कमी करण्यासाठी अजिबात डाएटिंग केलं नाही, त्याऐवजी तो रोज पिझ्झा खातो. तुम्हाला ही गोष्ट ऐकायला विचित्र वाटेल पण ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे. फिटनेस ट्रेनरने त्याचे जुने आणि नवीन फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याच्या शरीरातील फरक सहज दिसून येतो.
LadBible च्या मते, वजन कमी करणाऱ्या फिटनेस ट्रेनरचे नाव रेयान मर्सर आहे, जो आयर्लंडचा रहिवासी आहे. 34 वर्षीय रेयानने दावा केला की त्याने 30 दिवस दिवसातून तीन वेळा पिझ्झा खाल्ला आणि वजन कमी केले. रेयानने 30 दिवस दररोज पिझ्झाचे 10 स्लाईस खाल्ले आणि असं केल्याने त्याने त्याचे वजन सुमारे 3.4 (7.5 एलबीएस) कमी केले. तुमचे आवडते पदार्थ न सोडता वजन कमी करणे शक्य आहे हे लोकांना दाखवण्यासाठी रेयानने हे आव्हान स्वीकारले.
रेयानने यासाठी आपला डाएट खूप व्यवस्थित तयार केला आणि ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरसाठी फक्त पिझ्झा खाल्ला. प्रत्येकाचे शरीर सारखे नसते आणि प्रत्येकाच्या शरीराच्या गरजाही वेगळ्या असतात, त्यामुळे कोणीही माझा आहार फॉलो करू नये, असंही तो म्हणाला. रेयानने मुलाखतीदरम्यान सांगितले की, 'जेव्हा फिटनेसच्या उद्दिष्टांचा विचार केला जातो, तेव्हा जानेवारीचा थंडीचा महिना प्रत्येकासाठी खूप कठीण असतो, म्हणून मी माझे फिटनेस लक्ष्य पूर्ण करण्यासाठी जानेवारी महिना निवडला. मी जानेवारीपासून माझा वजन कमी करण्याचा प्रवास सुरू केला.
मी दिवसातून दोन पिझ्झा खाऊ शकतो. कॅलरी संतुलित करून, मी पिझ्झाचे 10 स्लाइस खाल्ले पण मी व्यायाम करणे थांबवले नाही आणि शारीरिकरित्या सक्रिय राहिलो. रेयान पुढे म्हणाला, पिझ्झाची किंमत दररोज 885.8 रुपये (10 युरो) आणि स्नॅक्ससाठी दररोज 266 रुपये (3 युरो) होते. पिझ्झा हा माझा आवडता पदार्थ आहे, म्हणून मी तो 30 दिवस उत्साहाने खाल्ला, पण मला पिझ्झाचे विविध प्रकार खायला आवडतात. मी दररोज 140 ग्रॅम प्रोटीन खात खायचो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"