शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
3
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
4
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
5
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
6
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
7
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
8
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
9
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
10
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
11
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
12
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
13
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
14
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
15
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
16
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
17
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
18
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
19
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
20
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा

Girlfriend ने वजनावरून हिणवलं; युवकानं स्वत:ला 'असं' बदललं की सगळे पाहतच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2022 2:49 PM

मी पहिल्या दिवशी जिममध्ये १७ मिनिटे व्यायाम केला. त्यानंतर वेळ वाढवला. दीड वर्षात माझं वजन १०४ किलोहून ५९ किलोपर्यंत कमी झाले असं अर्जुनने म्हटलं. 

नवी दिल्ली - वजन कमी करणं हे अनेकांसाठी आव्हानात्मक काम असतं. वजन घटवण्यासाठी डाइटपासून जिमपर्यंत मेहनत घेतली जाते. एका २४ वर्षीय मुलाने ८४ दिवसांत जे काही केले त्यामुळे त्याचे जवळपास ४० किलो वजन कमी झालं. या मुलाच्या फिटनेस जर्नीबाबत एका वृत्तवाहिनीनं मुलाखत घेतली. त्याने वजन कमी कसं केले? कुठले डाइट केले याबाबत जाणून घेऊया. 

नाव - अर्जुन शाह(Arjun Shah) वय - २४ वर्ष शहर - कानपूर, उत्तर प्रदेशवजन - एकूण १०४ किलोकमी केलेले वजन - ४० किलो

अर्जुन शाहने सांगितले की, मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा माझं वजन वाढण्यास सुरुवात झाली. मी कुठल्याही खेळाच्या स्पर्धेत भाग घेतल्यावर माझी खिल्ली उडवली जायची. लोक माझी चेष्टा करायचे. पोट वाढल्यामुळे अनेकजण मस्करी करायचे. माझ्या शालेय जीवनात मला कधीच एन्जॉय करता आले नाही. मी १२ वीत असताना माझी एक गर्लफ्रेंड बनली. मी ढिला टीशर्ट घालायचो जेणेकरून माझे वाढलेले वजन दिसू नये. सर्व व्यवस्थित सुरू होतं. तेव्हा गर्लफ्रेंडनं मुले शर्टमध्ये चांगले दिसतात असं म्हटलं परंतु माझ्या वाढलेल्या वजनामुळे मी शर्ट घालत नव्हतो. 

तसेच त्यानंतर माझ्या गर्लफ्रेंडने हळूहळू माझ्याशी बोलणं कमी केले. माझ्या वजनामुळे मला जाड्या बोलत तिने दुसऱ्याला डेट करायला सुरुवात केली. त्यादिवशी माझं मन दुखावलं. हाच दिवस माझ्या ट्रांसफॉर्मेशनचा पहिला दिवस ठरला. मला फिट व्हायलाच लागेल असं मी ठरवलं. मी पहिल्या दिवशी जिममध्ये १७ मिनिटे व्यायाम केला. त्यानंतर वेळ वाढवला. दीड वर्षात माझं वजन १०४ किलोहून ५९ किलोपर्यंत कमी झाले असं अर्जुनने म्हटलं. 

दरम्यान, माझ्या कोचने मला सिंपल डाइट दिली होती ती मी फॉलो करत होतो. मी सकाळी उठल्यावर ब्लॅक कॉफी प्यायचो त्यानंतर व्यायाम करायचो. सोया चंकच्या पीठापासून बनलेली रोटी खायचो. त्यामुळे मला प्रोटीन मिळायचे. रोटी पनीर बुर्जी खात होतो. त्यानंतर संध्याकाळी स्कूप प्रोटीन शेक आणि रात्री पुन्हा लंच रिपीट करायचो. हिरव्या भाज्या डाइटमध्ये समावेश होत्या. त्याशिवाय मी कुठलेही डाइट केले नाही आणि माझे वजन कमी होत गेले असंही अर्जुनने सांगितले.