Wife Carrying World Championship: भारतात काही मंदिरांमध्ये पत्नीला देवाच्या दर्शनासाठी नेताना तुम्ही अनेकदा काही लोकांना पाहिलं असेल. पण पत्नीला खांद्यावर किंवा पाठीवर बसवून धावण्याची एक अनोखी स्पर्धा फिनलॅंडमध्ये अनेक वर्षांपासून आहे. इथे पती आपल्या पत्नीला खांद्यावर घेऊन धावतात. चला जाणून घेऊ या अनोख्या खेळाबाबत...
पत्नीला उचलून धावण्याची ही वर्ल्ड चॅम्पियनशिप (Wife Carrying World Championship) 31 वर्ष जुनी आहे. फिनलॅंडच्या यूकोनकांटो येथील सोनकाजर्वीमध्ये 1992 पासून हा खेळ सुरू झाला होता.
याची परंपरा कधी आणि कशी सुरू झाली याची माहिती नाही. पण लोक वेगवेगळे किस्से सांगतात. आज जगभरात पतीने पत्नीला उचलून नेण्याचा खेळ खेळला जातो. अनेक देशांमध्ये तर याला खेळाचं रूप देण्यात आलं आहे.
यातील स्पर्धकांना आपल्या पत्नीला वेगवेगळ्या पद्धतीने उचलून नेण्याची परवानगी असते. पत्नी आपल्या पतीच्या खांद्यावर उलटी लटकते. तर पती त्यांना खांद्यावर घेऊन धावतात. यात जिंकणाऱ्याला बक्षीसही मिळतं.
जे कुणी या रेसमध्ये जिंकतात त्यांना पत्नीच्या वजनाच्या बरोबरीत बीअर दिली जाते. जगभरात हा खेळ फेमस झाला आहे. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका, भारत, हांगकांग आणि जर्मनीत हा खेळ खेळला जातो.
वाइफ कॅरीइंग चॅम्पियनशिपचे काही नियम असतात. ज्यानुसार पत्नीचं वय 17 पेक्षा जास्त असावं. तर तिचं वजन कमीत कमी 49 किलो असावं. जर पत्नी हलकी असेल तर त्यांना अधिकारी एक वजनदार रूकसॅक दिली जाते.