जगभरात लग्न हा एक महत्वाचा आणि आनंदाचा समारंभ असतो. वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या धर्मांमध्ये लग्नाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. जगात अशीही काही लग्ने झाली आहेत, जी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिली. काही लग्ने भरमसाठ खर्चासाठी चर्चेत होती तर काही लग्ने आपल्या साधेपणासाठी. मात्र, एक असंही लग्न झालं, जे नेहमीच्या परंपरेपेक्षा वेगळं होतं. हे लग्न जमैकाच्या एका रिसॉर्टमध्ये झालं होतं. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या लग्नात सगळे लोक कपडे न घालताच पोहोचले होते. केवळ लोकच काय तर नवरी-नवरदेवानेही अंगावर एकही कपडा घातला नव्हता.
या लग्नाची आणखी एक वेगळी खासियत म्हणजे इथे केवळ एकाच जोडप्याने नाही तर तब्बल २९ जोडप्यांनी लग्न केलं. म्हणजे हा एक वेगळा सामूहिक विवाह सोहळा होता. सगळ्यांनी अंगावर कपडे न घालता लग्नाचे रितीरिवाज पार पाडले. हे लग्न २००३ मध्ये झालं होतं. ज्यात सगळ्या नवरी आणि नवरदेव कपड्यांविना पोहोचले होते.जमैकाच्या सेंट एनमध्ये हेडोनिज्म III रिसॉर्टमध्ये हे लग्न पार पडलं. त्यावेळी या लग्नाची खूप चर्चा झाली होती. हे लग्न २००३ मध्ये व्हॅलेंटाईन डे ला पार पडलं होतं. हॉटेलजवळ समुद्रकिनारी असलेल्या लॉनवर एक तास चाललेल्या या लग्नात सगळी जोडपी नग्नावस्थेत होती.
या लग्नात भाग घेणारे जोडपे वेगवेगळ्या देशांतून आणि वेगवेगळ्या प्रोफेशनचे होते. फ्लोरिडाच्या यूनिव्हर्सल लाइफ चर्चकडून लग्नाचे रितीरिवाज पार पाडण्यात आले होते. महत्वाची बाब म्हणजे या रिसॉर्टमध्ये याआधीही अशाप्रकारचे लग्ने झाली होती. यासाठी हे रिसॉर्ट फेमस आहे. हे अशाप्रकारे आणि एकाचवेळी सगळ्यात जोडप्यांनी नग्न स्थितीत लग्न होणारा हा पहिला समारोह होता.
या लग्नात एका नवरीच्या १८ वर्षीय मुलीने आणि तिच्या बॉयफ्रेन्डने सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. ते लग्नात डोळ्यांवर पट्टी बांधून सहभागी झाले होते. तर इतर जोडप्यांच्या परिवारांना हे सगळं विचित्र वाटलं होतं.