जगभरात आजही अनेक विचित्र रितीरिवाज पाळले जातात. जगभरात होणाऱ्या लग्नांमध्ये वेगवेगळ्या परंपरा पाळल्या जातात. ज्याबाबत वाचून लोक हैराण होतात. या रितीरिवाजांना खास महत्वं असतं. भारतीय लग्नांमध्ये शूज चोरी करण्याचा रिवाज फेमस आहे. काही देशांमध्ये फारच वेगळे रिवाज असतात.
आज आम्ही तुम्हाला साउथ कोरियामध्ये होणाऱ्या लग्नातील एका रिवाजाबाबत सांगणार आहोत. ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. या देशात लग्नादरम्यान तरूणांना पुरूषत्व सिद्ध करावं लागतं. ज्यासाठी त्यांना चांगलीच मारहाण केली जाते. चला जाणून घेऊ काय आहे हा रिवाज...
साउथ कोरियामध्ये लग्नानंतर नवरदेवाला नवरीसोबत बांधलं जातं आणि दोघांनाही उलटं लटकवलं जातं. त्यानंतर त्यांच्या तळपायांवर काठीने मारलं जातं. त्याशिवाय नवरदेवाला शूजनेही मारलं जातं.
ही परंपरा पाळण्याचं एक महत्वाचं कारण आहे. साउथ कोरियामध्ये लोक मानतात की, जे तरूण या परंपरेत पास होतात, त्यांना आयुष्यात समस्या येत नाहीत. ते आधीच मार खातात, त्यामुळे आयुष्यभर ते मजबूत राहतात.
साउथ कोरियामध्ये लोक फार आनंदाने हा रिवाज पाळतात. असंही सांगितलं जातं की, नवरदेवाने मित्रच नवरदेवाला उलटं लटकवतात आणि त्याच्या पायावर काठीने मारतात. अशाप्रकारे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे रिवाज पार पाडतात.