जगात पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. कुणी नोकरी करून पैसे कमावतात, तर कुणी व्यवसाय करून पैसे कमावतात. पण, एक व्यक्ती अशीही आहे, जी केवळ गाढ झोप घेऊन चांगले पैसे कमावते. हे ऐकल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. खरे तर, झोपेच्या माध्यमाने पैसे कमवण्याच्या त्याच्या या 'अनोख्या जॉब'बद्दल त्याने स्वतःच सांगितले आहे.
खरे तर, झोपेच्या माध्यमाने पैसे कमावणारी ही व्यक्ती YouTuber आहे. त्याच्या यूट्यूब चॅनेलचे नाव Super Mainstream असे आहे. येथे तो आपला एकटे झोपलेला व्हिडिओ लाइव्ह रेकॉर्ड करतो आणि नंतर यूट्यूबवर पोस्ट करतो. लोक त्याचे व्हिडिओ पाहतात आणि त्या बदल्यात त्याला पैसे देतात. चला तर जाणून घेऊया हे कसे होते...
YouTuber च्या व्हिडिओमध्ये काय असते? -पैसे कमावून देणाऱ्या या व्हिडिओमध्ये, YouTuber झोपण्याचा प्रयत्न करतो. तर त्याचे चाहते Alexa स्पीकरच्या माध्यमाने मेसेज, व्हिडिओ आणि गाणी चालवून त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. या 21 वर्षीय YouTuber ने Vice News शी बोलताना सांगितले की, आठवड्यातून एकदा सहा तास YouTube लाइव्ह करून तो £2,000 (रु. 2 लाख) पेक्षा अधिक कमावतो. म्हणजेच एका आठवड्यात दोन लाख रुपये कमावले.
यूट्यूबवर त्याचे स्लिप स्ट्रिम अत्यंत लोकप्रिय होत आहेत, त्याचे व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळत आहेत. हजारो प्रेक्षकांसमोर तो स्वतःला लाइव्ह करतो आणि झोपी जातो. लोक फोन-मेसेज आदी करून त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. महत्वाचे म्हणजे अनेक लोक अशा पद्धतीने कमाई करत आहेत.
2017 मध्ये हा ट्रेंड सुरू झाला, तेव्हा त्यावेळचा YouTuber Ice Poseidon ने रात्रभर स्वतःचे चित्रीकरण करून 5,000 डॉलर (रु. 3.5 लाखांपेक्षा जास्त) रुपये कमावले होते. यानंतरच्या वर्षी Asian Andy ने झोपण्याचे लाइव्ह रेकॉर्डिंग सुरू केल्यानंतर ते YouTube वर अधिकच लोकप्रिय झाले. यानंतर इतर अनेक मोठ्या YouTubers ने हा ट्रेंड पुढे नेला.