ओडिशा (Odisha) ची राजधानी भुवनेश्वरमधून एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. इथे एक चांगल्या पगारावर काम करणाऱ्या नर्सने आपली नोकली आणि तिने पतीसोबत बेवासर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम सुरू केलं. महिलेने कोरोना संकटात हा निर्णय घेतला कारण संक्रमित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईक घाबरत आहे. त्यांना कोरोना होण्याची भीती असल्याने ते असं करत आहेत.
या महिलेचं नाव मधुस्मिता प्रुस्टी आहे. तिने सांगितलं की, ती कोलकाता येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये पॅनडेमिक डिपार्टमेंटमध्ये काम करत होती. २०११ ते २०१९ पर्यंत तिने इथे नोकरी केली. यानंतर तिने निर्णय घेतला की, ती बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आपल्या पतीची मदत करेल. कारण त्यांच्या पायाला जखम झाली होती. ती २०१९ मध्ये ओडिशामध्ये परत आली आणि बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करू लागली. (हे पण वाचा : नेता असावा तर असा! ब्रश न मिळाल्यानं भाजप खासदारानं हातानं स्वच्छ केलं कोविड सेंटरमधील टॉयलेट)
मधुस्मिताने सांगितलं की, तिने गेल्यावर्षी ३०० कोविड रूग्णांच्या मृतदेहांचा अंत्यसंस्कार केला. तेच गेल्या अडीच वर्षात तिने ५०० बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केला. मात्र, महिला असूनही अंत्यसंस्कार करत म्हणून तिला समाजाच्या टिकेचा सामनाही करावा लागला. पण ती कधीही मागे हटली नाही. ती प्रदीप सेवा ट्रस्ट अंतर्गत काम करते. या ट्रस्टचं नाव तिच्या पतीच्या नावावर आहे. (हे पण वाचा : Coronavirus : रक्त पिणाऱ्या जळूचा डॉक्टर घेत आहेत शोध, कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी होणार वापर?)
मधुस्मिताने पुढे सांगितलं की, तिने भुवनेश्वर म्युनिसिपल कॉर्पोरशनसोबत एक करार साइन केला आहे. ती कोविडा हॉस्पिटलमधून संक्रमित मृतदेह घेऊन जाऊन त्यांवर अंत्यसंस्कार करते. सलाम मधुस्मिताच्या या कामाला.