लॉकडाऊनच्या काळात कोणता ट्रेण्ड हीट ठरला असेल तर तो म्हणजे घरात विविध पदार्थ बनवून खाणे. पण या लॉकडाऊनमध्ये खव्वयेगिरी करण्यासाठी अजिबात बाहेर पडू नका. कारण तोडांचे चोचले पुरवायला गेलेल्या एकाला त्याची खव्व्येगिरी चांगलीच महागात पडली आहे.तर मंडळी त्याचं झालं असं की पश्चिम बंगालमधील चंदनपूर गावातील एक व्यक्ती रसगुल्ला खाण्यासाठी बाहेर पडला. रसगुल्ला शोधत असताना त्याला पोलिसांनी पाहिले. तो इकडे तिकडे फिरत असल्याने पोलिसांनी त्याला हटकले. त्याच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्याने तो सुरुवातीला घाबरला. त्यानंतर त्याने रसगुल्ला खाण्यासाठील बाहेर फिरत होता असे त्याने सांगितले. तशी पाटीच त्याने गळ्यात लटकवलेली. रसगुल्ला खाण्यासाठी तो कुठे मिळतो का ते शोधत तो इतरत्र फिरत असल्याचेही पोलिसांना सांगितले. मात्र यानंतर त्याला पोलिसांच्या दांडक्याचा असा प्रसाद खावा लागला की तो खाल्ल्यावर रसगुल्ल्याची चवच विसरून गेला.शासनाने कितीही कडक निर्बंध लावले तरी कारण काढुन इथे तिथे फिरणाऱ्यांची काही कमी नाही. कोरोनाकाळात शासन सर्वोतपरी काळजी घेत असताना नागरिकांनी शासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. त्यातही पश्चिम बंगालमध्ये कोरोनाने कहर केलाय. त्यातही अशी गळ्यात पाटी लटकवून घराबाहेर पडले हे त्या माणसाला कसे जमले हे त्यालाच ठाऊक.पण मित्रांनो तुम्ही अशी चूक करू नका कारण तुम्हाला माहित असेलच की पोलिसांच्या दांडीचा प्रसाद हा रसगुल्ल्यापेक्षाही 'गोड' असतो.
लॉकडाऊनमध्ये रसगुल्ला खायला गेला आणि पोलिसांचा प्रसाद खाल्ला...हा धम्माल व्हिडिओ बघाच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 4:43 PM