महासागरांमध्ये पाण्यांसोबत अनेक रहस्यही असतात. जे मनुष्यांना फार क्वचित माहीत असतात. मनुष्य कितीही दावे करत असतील की, त्यांना पृथ्वीबाबत सगळं माहीत आहे, पण सत्य हे आहे की त्यांना समुद्राबाबत बरंच काही माहीत नसतं. यातीलच एक म्हणजे व्हेल. व्हेलबाबतच्या अनेक गोष्टी हैराण करून सोडतात.व्हेल जगातील सगळ्यात मोठे जीव आहेत. यांच्या अनेक प्रजाती आहेत ज्या साइजमध्ये वेगवेगळ्या असतात. पण जेव्हा यांच्यासमोर मनुष्य येतात तेव्हा ते उंदरासारखे लहान दिसू लागतात.
ब्लू व्हेल (Blue whale facts) जगात सगळ्यात मोठ्या असतात. ब्लू व्हेल आकाराने डायनासॉर पेक्षाही मोठ्या असतात. नेशनल जियोग्राफिकच्या रिपोर्टनुसार, ब्लू व्हेल 100 फूटापर्यंत मोठ्या असतात आणि त्यांचं वजन 200 टनापर्यंत असू शकतं. तसेच त्यांची जिभ एका हत्तीच्या वजना इतकी असते.
उलटीला मिळतात कोट्यावधी रूपये
उलटीचं नाव घेताच अनेकांना किळस येते. पण तुम्ही कधी विचारही केला नसेल की, उलटी कोट्यावधी रूपयांना विकली जाते. व्हेलची उलटी कोट्यावधी रूपयांना विकली जाते. ही उलटी म्हणजे शरीरातून निघणारी घाण असते जी आतड्यांमधून बाहेर येते. ही उलटी मेणासारखी असते. जेव्हा व्हेल अनेक गोष्टी खातात आणि त्या पचत नाही तेव्हा त्या अशा बाहेर येतात. व्हेलच्या उलटीपासून अनेक प्रकारचे परफ्यूम बनवले जातात. त्यामुळे कंपन्या या उलटीसाठी कोट्यावधी रूपये देतात.
फार मोठं असतं हृदय
व्हेल फॅक्ट्सनुसार व्हेलच्या हृदयाचं वजन 180 किलो असतं. मनुष्यांचं हृदय एक मिनिटात 60 ते 100 वेळा धडधडतं. तर व्हेलचं हृदय एका मिनिटा 2 ते 10 वेळा धडधडतं. जेव्हा व्हेल पाण्याखाली असते तेव्हा हृदय इतक्या जोरात धडधडतं की, त्याचा आवाज 3 किलोमीटर अंतरावरही येतो.